शेगावात भाजपकडून फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत जल्लोष

0
1199
Google search engine
Google search engine

शेगावात भाजपकडून फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत जल्लोष

शेगाव : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्रजी फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शेगाव मध्ये 22 नोव्हेंबर रोजी सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची प्रचंड आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.तसेच मिठाईचे वाटप केली गेली.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सत्ता नाट्य सुरू आहे.एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी कडून येत्या 2-3 दिवसात सरकार स्थापन होण्याची शक्यता असताना अचानकपणे 22 नोव्हेंबर च्या रात्रीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली.राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने सकाळी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेतली आणि लगेच साडे सात ते आठ वाजेदरम्यान मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजभवनात शपथ घेतली. यानंतर भाजपाच्या गोटात प्रचंड उत्साह संचारला.
शेगाव शहर व तालुका भाजपाच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ढोल-ताशांच्या प्रचंड गजरात फटाक्‍यांची मोठ्याप्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली. त्याच प्रमाणे मिठाईचे वाटप करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
या जल्लोष प्रसंगी शेगावच्या नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई बुच उपाध्यक्ष सौ ज्योतिताई कचरे, भाजप गटनेते शरदसेठ अग्रवाल,भाजपनेते पांडुरंग बुच,माजी नगराध्यक्ष पी एम शेगोकार ,गजानन जवंजाळ,भाजप शहराध्यक्ष डॉ मोहन बानोले, न प पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा,प्रदीपभाऊ सांगळे,संजय कलोरे,नितीन शेगोकार,राजू अग्रवाल,राजेंद्र शेगोकार,मोहन हुसे,विजयबापू देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोविंदराव मिरगे,पांडुरंग शेजोळे,देवानंद घुईकर,अरविंद इंगळे,सुधाकर चव्हाण,अशोक चांडक,कमलाकर चव्हाण,अँड समीर मोरे,डॉ राजेश सराफ,नगरसेविका ज्योतिताई चांडक,
रोहित धाराशिवकर,अमित जाधव,विजय यादव,प्रमोद काठोळे,राजू भिसे,भागवत रोठे,विजय बुच,गणेश शेळके,शंकर माळी, जितेंद्र अग्रवाल,दीपक शर्मा,यांचेसह असंख्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी हजर होते.