अमरावती जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष,  तर विविध तालुक्यातील पं. स. सभापती, उपसभापती निवडणूक जाहीर

0
1151
Google search engine
Google search engine

अमरावती– जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीसह 10 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय पवार यांनी जाहीर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 6 जानेवारी 2020 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. त्याचप्रमाणे, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड, चिखलदरा या पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक 30 डिसेंबरला दुपारी दोन वाजता या पंचायत समित्यांच्या सभागृहात होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 6 जानेवारीला दुपारी तीनला होणार असून, याच दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. दुपारी तीन वाजता नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे व अर्जांची छाननी करण्यात येईल. छाननी संपल्यावर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनीटांचा वेळ असेल. त्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान होईल. त्यानंतर तत्काळ मतमोजणी होईल.
पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक 30 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होईल. याचदिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. दुपारी 2 ते 2.10 या कालावधीत उमेदवारांची नावे वाचणे व छाननी होईल. छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी 15 मिनीटे वेळ असेल. त्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे जाहीर होतील. आवश्यकता भासल्यास प्रथम सभापती व नंतर उपसभापती पदासाठी निवडणूक मतदान व तत्काळ मतमोजणी होईल.