तेल्हारा पत्रकार संघातर्फे आरोग्य तपासणी व दंत चिकित्सा शिबिर

0
514
Google search engine
Google search engine

पत्रकार दिनानिमीत्त आयोजन

तेल्हाराः प्रतिनिधी

तेल्हारा तालुका पत्रकार संघ व शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त सोमवार दिनांक सहा जानेवारी 2020 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शासकीय ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य रोग तपासणी, आरोग्य तपासणी व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तथा प्राथमिक स्वास्थ्य केंद्र हिवरखेड येथे नेत्रतपासणी शिबिर पार पडणार आहे यानिमित्त तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्र.सु.ढोकणे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा जयश्री पुंडकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक तापडिया दंत तज्ञ डॉक्टर आशिष करोळे डॉक्टर राजश्री दारोकार ,पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सत्यशील सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने या शिबिराचे उद्घाटन होणार आहे तरी समस्त पत्रकार बंधु व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तेल्हारा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.हिवरखेड येथे डॉक्टर महेश मुरकर यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.