कालवाडी येथे रब्बी हरभरा विषयक कार्यशाळा संपन्न

0
1207
Google search engine
Google search engine

आकोट: ता.प्रतीनीधी

येथून जवळच असलेल्या ता. अकोट जि. अकोला येथे नानाजी देशमुख प्रकल्पा अंतर्गत रब्बी हरभरा वर्ग ४ करीता शेतीशाळा व चर्चासत्र पार पडले .

प्रगतशील शेतकरी प्रमोद हिंगणकर यांचे शेतातआयोजित कार्यशाळेत शेतक-यांना मार्गदर्शन आले होते.कीटक सर्वेक्षण व मित्र किटकांचा परिचय,हरभरा वरील किडिंची ओळख सर्वेक्षण व एकात्मिक व्यवस्थापण,फवारणी करताना घ्यायची काळजी,सुक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व व् व्यवस्थापन,ओलित नियोजन व ई.
, कामगंध सापड्यांद्वारे कीड नियत्रंन करणे , पक्षी थांबे उभारण्याचे महत्त्व व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहीती दिली ,किडीची आर्थिक नुकसान पातळी(ETL) समजून घेणे,दशपर्णी अर्क,निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धती समजून घेऊन,त्याचे फायदे व महत्व ई विषयावर समन्यवक . दिलीप बोबडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ..
शेती शाळेला कृषि सहाय्यक पी.पी. ठाकरे ,समुह सहाय्यक अमर भटकर ,सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद हिंगणकर ,माजी सरपंच दादाराव हिंगणकर ,सारीपुत्र तेलगोटे,हरिदास मोहोड,रामेश्वर हिंगणकर ,सुनिल हिंगणकर ,गोपाल रावणकार व ईतर शेतकरी उपस्थित होते ..