दुकाने व आस्थापना मालकांनी-चालकांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक

205
जाहिरात

दुकाने व आस्थापना मालकांनी-चालकांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक

बीड: नितीन ढाकणे

बीड, दि. 25, (जि. मा. का):- दुकाने व आस्थापना मालकांनी-चालकांनी आस्थापना सरु केल्यापासून 60 दिवसाचे आत ऑनलाईन पधदतीने कलम 6(1) नुसार नोंदणी करणे करीता नमूना “अ” अर्ज करणे आवश्यक आहे.  महाराष्ट्र शासनाने अधिसुचनेनुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम,1948 निरसित करुन सुधारीत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या तरतूदी हया संपुर्ण महाराष्ट्र राज्यास लागू केल्या असुन  अधिसुचनेनुसार ज्या आस्थापनेत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करीत असतील अशा आस्थापनांना सुधारीत अधिनियमाच्या तरतूदी  लागू राहातील.

सुधारीत अधिनियमाच्या तरतूदीखालील प्रमाणे आहेत. ज्या आस्थापनेत 0 ते 9 पर्यंत कामगार काम करीत असतील अशा आस्थापना चालकांनी/मालकांनी  आस्थापना सुरु केल्यापासून 60 दिवसाचे आंत ऑनलाईन पध्दतीने शासनास अधिनियमाच्या कलम 7(1) नुसार नमूना “फ” मध्ये  आस्थापना चालू केल्याची फक्त सुचना दयावयाची आहे व सुचना मिळाल्याची  ऑनलाईन पोहच पावती नमूना “ग” मध्ये  तात्काळ प्राप्त होते सदरहू पोहच पावती आस्थापनेमध्ये  दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावी. आस्थापनेचे नांवाचा फलक हा मराठी देवनागरी लिपित असावा तथापी आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबर  व इतर भाषेतही लिहू शकतो तथापी मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या अकारापेक्षा लहान असू नये ज्या आस्थापनेत मदय किंवा मदयपान सेवा दिली जाते अशा आस्थापनांना  महापुरुषांची किंवा गडकिल्यांची नांवे देण्यात येवू नये. दि.3 मार्च 2019 च्या शासननिर्णया नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता काढुन टाकण्यात आलेली आहे.

नोंदणी प्रमाणपत्रात काही बदल झाला असल्यास उदा. आस्थापनेचे नांव,मालकाचे नांव,पत्ता, कामगार संख्येत  कलम 9 नुसार बदलाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत (10किंवा त्या पेक्षा जास्त कामगार काम करत असतील अशा आस्थापना चालकांनी  नमूना “आय” मध्ये व 10 ‍किंवा  त्यापेक्षा कामगार काम करीत असतील अशा आस्थापना चालकांनी नमूना “के” मध्ये) ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यकआहे.

व्यवसाय बंद केल्यास आस्थापना चालकाने 30 दिवसाचे आंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।