चांदूर रेल्वे पोलीसांची कारवाई :- नाकाबंदी करून दुचाकीने अवैध दारू वाहतुक करतांना दोघांना अटक 22 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
504
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
अवैध दारू वाहतुक करतांना दोन आरोपींना नाकाबंदी करून अटक केल्याची कारवाई बुधवारी दुपारी चांदूर रेल्वे पोलीसांनी केली. यामध्ये २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथुन मोहा दारू दुचाकी चांदूर रेल्वे कडे आणत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचुन सावंगी मग्रापुर ते चांदूर रेल्वे रस्त्याच्या मधात पतरिया यांच्या शेताजवळ सदर दुचाकी थांबविली असता त्यांच्याजवळ २ हजार रूपये किंमती ची मोहादारू आढळून आली. यामुळे दारूसह स्प्लेंडर दुचाकी अंदाजे किंमत २० हजार रूपये जप्त करून आरोपी कैलास नेवारे (४०) व त्र्यंबक राऊत (३८) रा. खडकपुरा, चांदूर रेल्वे यांना अटक करण्यात आली. यानंतर समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आले. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय शंकर ढोले, ना.पो.कॉ. विनोद वासेकर, पो. कॉ. शेख गणी यांनी केली.