चांदूर रेल्वेत घडले खाकीतील माणुसकीचे दर्शन – ठाणेदार दीपक वानखडेंची आठ सतरंजी विकेत्यांना मदत

0
504
Google search engine
Google search engine

शासकिय वसतीगृहात ९ मजुरांना जेवन देतांना सेवाभावी संस्था

पंधरा दिवसाच्या राशनची केली व्यवस्था

पश्चिम बंगाल येथून आले होते चांदूर रेल्वेत

तसेच मालखेड रेल्वेत नऊ मजुरांना चिमुरकडे जातांना थांबवुन होम क्वारंटाईन करून त्यांची देखभाल

चांदूर रेल्वे :

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन जिल्हाबंदी करण्यात आली असुन सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आहे. यामुळे चांदूर रेल्वेत सतरंजी विक्रीसाठी आलेले आठ पश्चिम बंगालचे विक्रेते कोरोना विषाणुच्या लॉक डाऊनमुळे चांदूर रेल्वेत अडकले. जवळचे पैसे संपल्यामूळे त्यांची उपासमार सुरू झाली. ही बाब त्यांनी ठाणेदार दीपक वानखडे यांना सांगीतली. ठाणेदार वानखडे यांनी त्यांची पंधरा दिवसाच्या रोशनची व्यवस्था करून देत माणुसकीचे दर्शन घडविले. तर दुसऱ्या घटनेत ठाणेदार वानखडे यांनी पायदळ चिमुरकडे निघालेल्या नऊ मजुरांना थांबवलं आणि तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात त्यांची कोरोना टेस्ट करून होम क्वारंटाईन करून स्थानिक शासकिय वसतीगृहात त्यांची व्यवस्था केली आहे.

पश्चिम बंगालचे आठ सतरंजी विक्रेते मार्च मध्ये चांदूर रेल्वे आले. ते चांदूर रेल्वेत मेहरबाबा नगरात भाड्याने राहत होतं. अशातच कोरोना विषाणुंमुळे सर्व व्यवहार ठप्प झालं. जवळचं पैसे संपल्याने त्यांची उपासमार सुरू झाली. त्यामूळे स्थानिक पो.स्टे. गाठून ठाणेदार दीपक वानखडे यांना त्यांची बिकट स्थिती सांगीतली. खाकीतील माणुस जागा होऊन ठाणेदार वानखडे यांनी त्वरीत पुढाकार घेऊन एका सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांच्या पंधरा दिवसाच्या राशनची व्यवस्था करून दिली. त्यामूळे त्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडलं. तर दुसऱ्या घटनेत बडनेरा येथील एका गोदामात चिमुरचे नऊ मजुर कामाला होते. अशातच कोरोना विषाणुंच्या प्रादुर्भावामूळे त्यांचे काम ठप्प झालं, मालकाने काम बंद केल्याने त्यांची उपासमार सुरू झाली. आधीच बेघर त्यात उपासमार. त्यामूळे त्यांनी चिमुर कडे परत जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे,बस सेवा बंद असल्याने ते काल बुधवारी पायदळ निघाले. अशातच दुपारी १ वाजता मालखेड रेल्वे येथे पोहचले असता चांदूर रेल्वे पोलिसांनी त्यांना थांबवलं. याची माहिती ठाणेदार वानखडे यांनी त्वरीत तहसीलदार इंगळे यांना कळविली. त्यानंतर त्यांना चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रूग्णालयात आणुन प्रथम कोरोना तपासनी केली. ती निगेटीव्ह असुन होम क्वारंटाईन करून त्यांना स्थानिक शासकिय वसतीगृहात ठेवले. तहसीलदार राजेंद्र इंगळे व मंडळ अधिकारी सतिश गोसावी यांनी त्यांची एका सेवाभावी संस्थेकडुन जेवनाची व्यवस्था केली आहे.