अकोटच्या ज्ञानदेव चवाळेंचे पीएम केअर्स फंडात १ लाख १ हजाराचे योगदान

0
1346
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

अभिमानास्पद.. सेवा परमो धर्म..!

कोविड – 19 विषाणु विरुद्ध जगभर लढाई सुरू आहे. भारतातही कोरोणाने आपले हातपाय पसरले आहेत. त्यामुळे देशात लाॕकडाऊन आहे. या आपत्तीत पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी गजानन नगर येथील ज्ञानदेव चवाळे यांनी १ लाख १ हजाराचे भरीव योगदान देत समाजासमोर अभिमानास्पद उदाहरण ठेवले आहे.त्यांनी एचडीएफसी बँक खात्यातून एनईएफटीद्वारे 3 एप्रिल रोजी पिएम केअर्स फंडमध्ये ही मदत दान केली आहे.

देशातील बेघर गरीब हातमजुर लोकांसह अनेकांवर सध्या बिकट प्रसंग ओढवला आहे.या संकटसमयी अनेक बेघर गरिबांची तर दोन वेळच्या जेवणासाठीही परवड होत आहे. या सर्व परिस्थितीतही मानवतेवर हावी झालेल्या संकटसमयी अनेक जण विविध प्रकारे देवदूत बनून मदत करताहेत. याच कडीत शहरातील गजानन नगर येथील ज्ञानदेव चवाळे यांनी भरीव मदत करत अकोट वासियांच्या मनातील दातृत्वाची प्रचिती देशवासियांना दाखवली आहे.ज्ञानदेव चवाळे यांनी याआधी पण अनेक समाजोपयोगी कार्यात लाखोंचं दान केले आहे.औरंगाबाद येथील जिरेमाळी समाजाच्या विद्यार्थी वस्तीगृहासाठी देखील १ लाखाची देणगी दिली असल्याचे त्यांनी बोलतांना सांगीतले. त्यांचे दहावी आयटीआय पर्यंत शिक्षण झालेले असुन प्रतिकूलतेवर मात करत स्वतःचे ऍग्रो वर्कशॉप उभे केले आहे.युवा उद्दोजक प्रदीप चवाळे व संदीप चवाळे ही त्यांची दोन मुले होत. त्यांच्या कारखान्यातील शेती अवजारांचा माल अनेक ठिकाणी विक्रीस जातो. प्रसिद्धी पासून कायम लांब राहणारे ज्ञानदेव चवाळे पिएम केअर फंडात भरीव योगदान दिल्यामुळे अकोट वासीयांसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या दातृत्वा मुळे सेवा परमो धर्म या उक्तीची प्रचिती आकोट शहर वासियांना येत आहे.या संकसमयी सर्वानी एकजुट होऊन लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.