परळी येथील दोन तलाठी सेवेतून निलंबित :बैठकीस सदर तलाठी हे जाणीव पूर्वक गैरहजर राहिले असल्याने निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे

0
1576
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ :नितीन ढाकणे

युद्धजन्य परिस्तिथीसारखी आपत्ती असताना हे तलाठी गैरहजर राहून कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्यामुळे आज शुक्रवार रोजी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी दोन तलाठी सेवेतून निलंबित केले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे देशात युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीत,
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने मा.जिल्हाधिकारी बीड यांनी दि.23/03/2020 व दि.26/03/2020 अन्वये कोरोना विषाणुचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश दि.24मार्च पासुन दि.14 एप्रिल पर्यंत नागरी, ग्रामीण व आदयोगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागु केला आहे. सदर मनाई आदेशाचे उल्लंघन होवु नये या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हयातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना त्यांच्या मुख्यालयी राहण्यासाठी व आदेशाचे पालन तंतोतंत पालन करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी बीड यांनी नमुद केले होते परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवणा-या दांडी बहादर तलाठ्यांच्या निलंबनाची आज कार्यवाही करण्यात आली आहे.
तलाठी सज्जा पिंपळगाव गाढेचे तलाठी सचिन सुधिर एरंडे, व नागपिंपरीचे तलाठी..मोतीराम गुंडेराव जिलेवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने ही निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
तलाठी हे ग्रामदक्षता समितीचे सचिव असल्याने सदर तलाठी यांनी आपले सज्जांवर स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करण्याबाबत दि.26 मार्च रोजी तहसिलदार यांनी सदर तलाठी यांना व्हाटसअप संदेश दिलेला असतांना सुध्दा संबंधित तलाठी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. तसेच कोरोना विषाणु जनजागृती संदर्भात दि.28 मार्च रोजी दुपारी 03.00 वा.तहसिल कार्यालय परळी व येथे ठेवण्यात आलेल्या बैठकीस सदर तलाठी हे जाणीव पूर्वक गैरहजर राहिले असल्याने निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे..