लॉकडाऊन मुळे कर्जदारांना कर्ज भरण्याकरिता ३ महिने वेळ द्यावा — आमदार देवेंद्र भुयार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे  मागणी 

कर्जदारांना दिलासा देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार ! 

0
619
Google search engine
Google search engine

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :
मोर्शी वरुड तालुक्यात कर्जदारांनी फयनान्स कंपन्यांकडुन कर्जावर साहित्य खरेदी केले आहेत. तसेच विविध फायनान्स कपन्यांकडून कर्जावर रक्कम घेतली आहे. परंतु कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊ करण्यात आल्याने कर्जदाराची आवक थांबली आहे, तसेच सर्व काम बंद असल्यामुळे कर्ज फेडण्यास अडचणी येत आहेत, परंतु  फायनान्स कम्पनीचे एजेंन्ट कर्ज भरण्याकरिता सातत्याने तगादा लावत आहेत. सध्या रोजगाराचा गंभीर प्रश्न उद्भवत असल्यामुळे  खात्यात पैसे शिल्लक ठेवणे कर्जदारांना अडचणीचे जात आहे. परंतु कर्जदारांच्या खात्यामधून फायनान्स कंपन्या परस्पर किस्त कपात करत आहे. खात्यात पैसे नसल्यास कर्जदाराला फोण करून  किस्त व धनादेश बाऊन्स चार्ज मागत आहेत. फायनान्स कंपन्या वसुली करिता फोन करून तगादा लावत असल्यामुळे कर्जदार अडचणीत सापडले असून त्यांचेवर उपासमारीची पाळी येऊन ठेपनी आहे . त्याकरिता या गंभीर समस्सेचा तातडीने तोडगा काढण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .
मोर्शी वरुड तालुक्यात अनेक फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांनी कर्ज घेतले  आहेत, या सर्व प्रकरणाला गंभीरतेने घेऊन कर्जदारांना ३ महिन्यांची कर्ज परतफेड करण्याची मुदत देण्यात यावी कोरोनो सारख्या महाभयंकर रोगामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून बाहेर पडण्यास सर्व सामान्यांना दिलासा मिळू शकेल . फायनान्स कंपन्यांच्या  या निर्णयावर आमदार देवेंद्र भुयार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हप्त्याची मुदत आणखी पुढे वाढवण्यात यावी पण अतिरिक्त व्याज लावू नये अशी मागनी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेल्याने आणि अनेक लोक घर किंवा संबंधित मालमत्ता भाड्याने देऊन त्यातून आलेल्या पैशातून हप्ते भरते. मात्र लॉकडाऊन काळात हप्ते मागावे कसे आणि अतिरिक्त व्याजाची रक्कम कशी जमवाववी या विवंचनेत कर्जदार अडकले आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग, व्यवसाय बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फायनान्स कंपन्या गृह, वाहन कर्जासह इतर कर्जांचे हप्ते भरण्यास बँकांनी कर्जदारांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी  अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे .
कोरोना रोगाच्या संसर्ग प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्जदारांना कर्ज भरण्याकरीता ३ महिन्यांची सवलत देणेबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी मागणी केली आहे .कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तसेच राज्यामध्ये प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये अमरावती जिल्हयाचे क्षेत्रातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार  देवेंद्र भुयार, आमदार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे .