कडेगावातील सर्व प्रशासन व पोलीस यांना४००फेसशिल्डचे वाटप

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगाव

कडेगावातील सर्व प्रशासनातील व पोलीस कोरोनाच्या युद्धात गेली ७८ दिवस सतर्क राहून कार्यरत आहेत हया कोरोना वाँरियर्सना कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी फेसशिल्ड आवश्यक होते महिद्रा कंपनी
व नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदेचे स्विय सहाय्यक सुर्यकांत पाटील यांच्या सहकार्याने व महिद्रा कंपनीच्या वतीने,कडेगाव पत्रकार संघ व द पाँवर आँफ मिडीया संघटनेच्या सौजन्याने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यातील,कडेगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी,प्रांतधिकारी,तहसीलदार ,ग्रामीण रुग्णालय,नगरपंचायत, पत्रकार, या सर्व कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना ४००फेसशिल्डचे वाटप करण्यात आले प्रांतधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डाँ शैलजा पाटील, पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी नगरपालिका मुख्याधिकारी कपील जगताप ग्रामीण रूग्णालय डाँ वैभव पत्की,कडेगाव तालुका प्रतिनिधी या सर्वांना फेसशिल्डचे वाटप पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार द पाँवर आँफ मिडीयाचे तालुकाध्यक्ष सदानंद माळी,युवा नेते ऋतुराज पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी वैभव पवार श्री पवार बाबासाहेब कांबळे व पोलीस कर्मचारी, सर्व प्रशासनातील कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते