मनसेच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी नवजीवन गोशाळेवर केला राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा !

0
890
Google search engine
Google search engine

मनसेच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी नवजीवन गोशाळेवर केला राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरुळ पाटी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अनोखा वाढदिवस साजरा केला. मनसेच्या माहिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांची मंगरुळ पाटी येथे नवजीवन गोशाळा आहे.सध्या १०० च्या जवळपास जनावरे आहेत. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून राज ठाकरे यांचा वाढदिवस गोशाळेत उत्साहात साजरा केला. गाईंना लाडूचे घास भरवले यावेळी मनसेचे कळंब येथील राज प्रेमी किशोर गोरे यांची खास प्रमुख उपस्थीती होती. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कोठावळे.माजी कळंब तालुका अध्यक्ष दत्ता घोगरे , कळंब शहर अध्यक्ष अमोल राऊत .रेवती जुगदर दुगदर साहेब ,अनिल गयकवाड यांच्यासह इतर कार्यकरते उपस्थीत होते