एस टी महामंडळाच्या गाडीतच सोशल डिस्टिनसिंगचा फज्जा

Google search engine
Google search engine


कराड / सातारा

सध्या महाराष्ट्राने कोरोना महामारीत काही देशाच्या पुढे आघाडी घेतली आहे.तरीही एस टी महामंडळ यांनी या घटना गांभीर्याने घेतलेल्या दिसत नाहीत. कराड ते सातारा जाणाऱ्या व येणाऱ्या गाडीत प्रवासी,शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना एकाच सिटवर दोघा दोघांना बसवून प्रवास करण्यास भाग पाडतात मात्र एस टी महामंडळाचे कर्मचारी यांनी मात्र सोशल डिस्टिसिंग पाळून सकाळ सव्वासात वाजता स्पेशल गाडी सोडून स्पेशल सेवा देण्यात येत आहे.
सध्या सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालये,बँका,पतसंस्था सुरू करण्यास परवानगी शासनाने देवून शासकीय कार्यालये शंभर टक्के सुरू झाली आहेत. तर निमशासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी कामावर जात आहेत. त्या बरोबरच इतर खाजगी लोक ही तालुका बंदी उठविल्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जात आहेत.यामुळे कराडहून.सातारा या ठिकाणी जाण्यासाठी दररोज २०० पेक्षा अधिक लोक सातारा जात आहेत.कराड शहरातून त्या बरोबरच उब्रज,काशिळ,आतित,नागठाणे या गावातील लोक सातारा जात आहेत.मात्र एस टी महामंडळाच्या कर्मचारी यांना मात्र स्पेशल वागणूक देण्यात येत आहे.त्यांना मात्र सकाळी ७ . १५ वाजता खास एस टी महामंडळाच्या कर्मचारी यांना सोडण्यात येते.या गाडीतही मोठी गर्दी होते.इतर कर्मचारी एस टी बसमध्ये अगदी पायऱ्यावर बसून जात आहेत.त्या नंतर साडे आठ,नऊ वाजता कराड सातारा गाड्या सोडतात या गाडीतही कोणत्याही प्रवाशांची आरोग्यांची काळजी न घेता चाळीस ते पन्नास लोक प्रवास करीत आहेत.लोकांना आपल्या ड्युटीवर जाण्याची घाई असते त्यामुळे जरी गर्दी झालीतर वेळप्रसंगी पायऱ्यावर बसून काही प्रवासी प्रवास करतात. जातानाही गदीँ होत आहे.परत सायंकाळी येतानाही तिच अवस्था असते.कराड सायंकाळी कितीही गदीँ झालीतरी सातारचे वाहतूक नियंत्रक त्यांच्या सातारा आगाराची बस सोडत नाहीत. त्यांना कराड आगाराच्या बस मधूनच चाळीत ते पचैचाळीस लोक प्रवास करतात. शासकीय नियमाप्रमाणे बावीस लोकांनी प्रवास करावा असा नियम असताना या नियमाची पायमल्ली होत आहे.यामुळे कराड व सातारा आगार प्रमुखांनी लोकांच्या जीवाशी खेळ करण्यापेक्षा प्रवाशी यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व जास्ती गाडयांची सोय करावी शासकीय नियमानुसार प्रवाशी यांची वाहतूक करावी.
एकंदरीत. मोठ्या तीन शहरानंतर सातारा जिल्हा व कराड तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात आघाडीवर असताना महामंडळाच्या कराड व सातारा आगार प्रमुखांनी काळजी घेणे गरजेचे आहे.