कामेगाव येथे एकाच दिवसात 1020 रोपांची लागवड !

0
1176
Google search engine
Google search engine

कामेगाव येथे एकाच दिवसात 1020 रोपांची लागवड:

उस्मानाबाद / प्रतिनीधी
वैश्‍विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत उस्मानाबाद जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संस्थाचे स्वयं सेवक यांच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून उस्मानानाद तालुक्यातील कामेगाव येथील गायरान जमिनीवर दिनांक 11 जुलै 2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या पुढाकारातून व निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात 1020 रोपांची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या रोपामध्ये 75 टक्के रोपे हि फळझाडाची निवडण्यात आली आहेत त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. यात चिंच,आवळा,सीताफळ,जांभूळ, साग,कडुलिंब,बांबू,पिंपळ,इत्यादी प्रजातीची लागवड करण्यात आली.यावेळी शास्त्रीय पद्धतीने रोपाची लागवड करण्याबाबत उपस्थिताना प्रादेशिक वन अधिकारी श्री पवार यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. सदर रोपांची जोपासना पुढील तीन वर्ष महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे यांनी सांगितले. सदर लागवडीसाठी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी पंचायत समितीचे सर्व ग्रामसेवक आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी सहाय्यक, वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी श्रमदान केले. तसेच वृक्षलागवडीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री नितीन भोसले,डॉ.गपाट,श्री रामभाऊ कदम व त्याचे स्वयंसेवक,हाफ मेरोथौन ग्रुपचे स्वयंसेवक,गावातील नागरिकांनी,तसेच परिसरातील युवकांनी श्रमदान केले. कृषी संजीवनी शेतकरी गटाचे सदस्यनी देखील ग्राम पंचायतीच्या मदतीने महाश्रमदानाचे उत्कृष्ट नियोजन केले. सदर महाश्रमदानास जि.प. अध्यक्ष सौ. अस्मिताताई कांबळे,पंचायत समिती सभापती चांदणे ताई व गणाच्या सदस्या सौ.सुवर्णताई इरकटे यांनी भेट देऊन सहभाग नोंदवला.
उक्त महाश्रमदान खालील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पाडले.
श्री.राजेंद्र खंदारे निवासी उप जिल्हाधिकारी,
श्री गणेश माळी तहसीलदार उस्मानाबाद,
श्रीमती समृद्धी दिवाणे, गट विकास अधिकारी
श्री डी.आर. जाधव, तालुका कृषी अधिकारी
श्री पवार, प्रादेशिक वन अधिकारी
श्री सुरेश तायडे, सहाय्यक गट विकास अधिकारी
श्री मुस्तफा खोंदे, नायब तहसीलदार
श्री केरुलकर, नायब तहसीलदार

सदर महाश्रमदानात पंचायत समिती उस्मानाबाद येथील विस्तार अधिकारी श्री संजय कळसाईत,तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी श्री कोळी,श्री तीर्थंकर,श्री चिरके,श्री नागटिळक,श्री कुलकर्णी, तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे श्री.आयनुळे, श्री.देशमुख,श्री.झांबरे व जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री गोपाळ आकुसकर,आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सदर महाश्रमदानासाठी ग्रामपंचायत कामेगाव सरपंच/उपसरपंच ग्रामसेवक/तलाठी व ग्रा.पं. सदस्य, कृषी संजीवनी शेतकरी गटाचे सदस्य,व गावकरी तसेच जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री रवी मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्राम पंचायत व कृषी संजवणी गटाच्या उत्कुष्ट नियोजनाबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आभार व्यक्त केले