सिबीएसई बोर्डात विद्यांचल द स्कुलचा १००% निकाल

0
1087
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

शहरातील पहील्या सिबीएसई बॕचवर कौतुकाचा वर्षाव…

सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अकोटच्या विद्यांचल द स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले.विशेष म्हणजे विद्यांचल ही अकोट शहरातील एकमेव सीबीएसई स्कूल असून शाळेची दहाव्या वर्गाची ही पहीलीच बॅच होती. यामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या गुणांनी यश संपादन केले.कु. अनुश्री शरद पालखडे 98% कु. राशी राजेश झुनझुनवाला 97% ईशान संदीप जोशी 96% यांनी विशेष प्रावीण्यासह गुण प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.विद्यांचल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असते.पहिल्याच बॅचचा उत्कृष्ट निकाल लागल्याने संस्थेचे अध्यक्ष नरेश भुतडा उपाध्यक्ष दिनेश भुतडा सचिव सौ. सारिका भुतडा शाळेच्या प्राचार्या डॉ.शैलजा त्रिवेदी व्यवस्थापकीय प्रमुख प्रशांत विनायक व सर्व व्यवस्थापनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहेतसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसे सर्व पालकांनी मुलांच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिलेल्या सहकार्याबद्दल शाळेतर्फे आभार व्यक्त केले मुलांच्या संपूर्ण यशात शिक्षक व शाळेच्या व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा असल्याचे मत सर्व पालकांकडून व्यक्त होत आहे.