*कापूस खरेदीसाठी मोर्शी-वरूडसाठी नरखेड येथे दोन केंद्राची सुविधा*

0
597
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 17 : जिल्ह्यातील मोर्शी व वरूड तालुकयातील शेतक-यांनी केलेली कापसाची नोंदणी अधिक असल्याने वेळेत खरेदी पूर्ण होण्यासाठी या तालुक्यांसाठी आणखी दोन केंद्रे वाढविण्यात आली आहेत.

मोर्शी व वरूड तालुक्यात शेतक-यांनी केलेली कापसाची नोंदणी अधिक असल्यामुळे कापूस खरेदीची प्रतीक्षा यादी मोठी आहे. हे लक्षात घेऊन कापूस खरेदीची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी राज्य पणन महासंघातर्फे वरूड तालुक्यासाठी लगतच्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील ओंकार इंडस्ट्रीज येथे, तर मोर्शी तालुक्यासाठी नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील गोपीनाथ इंडस्ट्रीज येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून कापूस खरेदीची प्रक्रिया लवकरात पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.