बार्टी समतादूत मार्फत अनुसूचित जातींचे माहिती संकलन

0
505
Google search engine
Google search engine

अकोटःता.प्रतिनिधी

अकोला जिल्हातील समतादूत यांचे मार्फत तालुका कार्यक्षेत्रातील ५९ अनुसूचित जातीतील गावनिहाय कुटुंब व सदस्य संखेची माहिती संकलन सुरू आहे.

समतादूत यांचेमार्फत आतापर्यंत अकोला जिल्हातील ३४७ गावामधील ५९ अनुसूचित जातीतील माहिती संकलित करण्यात आली आहे.
अकोला जिल्हातील ही संकलन मोहीम ‘बार्टी’ महासंचालक कैलास कणसे,समतादूत प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्या मुख्य मार्गदर्शनात रविना सोनकुसरे,वैशाली गवई अकोला,मनेश चोटमल मूर्तिजापूर,उपेंद्र गावंडे,विनोद सिरसाट बार्शीटाकळी,समता तायडे पातूर,प्रज्ञा खंडारे,स्मिता राऊत बाळापूर,शुभांगी लव्हाळे तेल्हारा,बालाजी गिरी अकोट हे माहिती संकलित करत आहेत.