अकोला शहर वाहतूक शाखेची अमरावती विभागात अव्वल कामगीरी

0
836
Google search engine
Google search engine

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शहर वाहतूक शाखेचा दणका

अकोलाःप्रतिनिधी

अकोला शहर वाहतूक शाखेने स्थापना झाल्या पासून सर्वोच्च कारवाया करत अमरावती विभाग कार्यक्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे 1 जानेवारी ते 25 जुलै पर्यंत अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता अकोला शहर वाहतूक शाखा आघाडीवर असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे,

अमरावती विभागातील आकडेवारी पाहता फक्त वाहतूक शाखेने केलेल्या 1 जानेवारी ते 25 जुलै पर्यंतच्या केलेल्या दंडात्मक कारवाया अकोला शहर वाहतूक शाखा एकूण 45,156, बुलडाणा 16,710, वाशिम 19,741, यवतमाळ 30,552, अमरावती 38,736 अश्या दंडात्मक कारवाया केल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखेने अकोला शहरातच केलेल्या आहेत हे विशेष, मागील दीड वर्षा पासून दंडात्मक कारवाया ह्या इ चालान मशीन द्वारे करण्यात येत आहेत.

त्याची आकडेवारी पाहता अकोला शहर वाहतूक विभागाकडे 26,बुलढाणा जिल्हा 09, वाशिम जिल्हा 07, यवतमाळ जिल्हा 50, अमरावती जिल्हा वाहतूक शाखेकडे 28 अश्या इ चालान मशीन कारवाई साठी उपलब्ध आहेत तसेच लॉक डाऊन च्या कालावधी मध्ये शहर वाहतूक विभागाने वेळोवेळी धडक मोहिमा राबवून नियमांचा भंग करणारी एकूण 2860 वाहने जप्त केली होती व जिल्हाधिकारी ह्यांचे आदेशाचा भंग करून वाहन चालविल्याने शहर वाहतूक शाखेने एकूण 58 गुन्हे शहराच्या विविध पोलीस स्टेशनला दाखल करून त्या मध्ये 1145 वाहने जप्त सुद्धा करण्यात आली होती.

बहुसंख्य कारवाया या नियम मोडणाऱ्या विरुद्ध लॉकडाऊन च्या काळात झाल्या असून तत्कालीन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर व पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम राबवत केल्यात. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक या कारवाया केल्या आहेत.

गजानन शेळके शहर वाहतूक पोलीस निरीक्षक