उस्मानाबादेत मुस्लिम समाजातर्फे उभारले चार मोहल्ला क्लिनिक ; रुग्णावर होणार मोफत उपचार !

0
396
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत मुस्लिम समाजातर्फे उभारले चार मोहल्ला क्लिनिक ; रुग्णावर होणार मोफत उपचार !


हुकमत मुलाणी / उस्मानाबाद


उस्मानाबादच्या जिल्हाधीकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद येथे मुस्लिम समाजातर्फे शहारात सध्या चार ठिकाणी मोहल्ला क्लिनीकची सुरवात करण्यात आली आहे. या क्लिनीक मध्ये सर्व रुग्णांना समाजातर्फे मोफत सर्व रुग्णावर उपचार व औषध मोफत सेवा देण्यात येणार आहेत. मालेगाव नंतर उस्मानाबाद शहारात प्रथमच हा उपक्रम राबवला जात आहे. दरम्यान,शहरातील अक्सा चौक खाजानगर उस्मानाबाद येथे मोहल्ला क्लिनिक चे उद्घाटन पोलिस अधिक्षक रौशन यांच्या हस्ते करण्यात आले उस्मानाबाद शाहरात चार ठिकाणी चार मोहल्ला क्लिनिकची सुरवात करण्यात आली आहे.या क्लिनिकमुळे उस्मानाबाद शहरातील नागरीकांना याचा फायदा होणार आहे.हे क्लिनिक सुरु करण्यासाठी उस्मानाबाद शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.
अक्सा चौक खाजानगर उस्मानाबाद येथे
मोहल्ला क्लिनिक चे उद्घाटन पोलिस अधिक्षक रौशन यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान
प्रस्ताविक शेख मसुद यांनी केले न घाबरता लवकर उपचार केल्यावर रुग्ण बरा होतो .फक्त रोग न लपवता निर्भिड पणे उपचारासाठी या वेळी रुपाली ताई आवळे उस्मानाबाद अप्पर जिल्हाधिकारी यांनी अव्हान केले नगराध्यक्ष नंदुभैय्या निंबाळकर यांनी मोहल्ला क्लिनिक ला नगर परिषद पूर्ण सहकार्य करेल आसे सांगितले , संजय निंबाळकर, डाँक्टर शकिल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले उस्मानाबादचे तहसिहदार गणेश माळी नगराध्यक्ष नंदुभैय्या निंबाळकर संजय निंबाळकर,डाँक्टर शकील ,जेष्ठ राजकीय समाजसेवक मसुद भाई शेख, डाँक्टर कादरी साहेब ,व शहरातील नगर सेवक सामाज सेवक राजकीय क्षेञातिल मान्यवर धर्म गूरु व राजकिय व या भागाचे नगर सेवक ईस्माईल शेख,बाबा मुजावर , खलीफा कुरेशी , मैनोद्दीन पठाण , आयाज शेख ,अनुवर शेख , इब्राहिम शेख , अफ्रोज पिरजादे ,वाजीद पठाण , एजाज काझी ,बिलाल तांबोळी ,इम्तियाज बागवान , शहानवाज सय्यद , mim चे शहराध्यक्ष ,
उपस्थित होते
या वेळी सर्वच मान्यवरानी शकिल भाई इंडिया मेडकल यांचे आभार व्यक्त केले त्यांनी स्वतःच्या इमारतीमध्ये तीन कोट व वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना स्वतंत्र केबिन अशी व्यवस्था केल्याबद्दल सर्व स्तरातून शकील भाई मेडिकल यांचे कौतुक होत आहे.प्रस्तावना सय्यद खलिल सर व बाबा फैजोद्दीन यानी केला.यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित उलैमा हजर होते.समाजातील राजकिय व सामाजिक व उलैमा यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.