स्वातंत्रदिनी राबविले,ग्राम स्वच्छता अभियान. *कुरणखेड येथिल युवकांचा उपक्रम.

0
514
Google search engine
Google search engine

स्वातंत्रदिनी राबविले,ग्राम स्वच्छता अभियान.
*कुरणखेड येथिल युवकांचा उपक्रम.
*ड्रीम व्हिलेज फौंडेशन कडून,घंटागाडी व कचराकुंडीचे सहकार्य.

चांदूरबाजार/प्रतिनिधी

ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत आपले गांव स्वच्छ व निरोगी राहावे यासाठी, तालुक्यातील कुरणखेड गांवात स्वातंत्रदिनी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.हा उपक्रम ड्रीम व्हिलेज फौंडेशनच्या संकल्पनेतून, गावातील युवकांनी राबविला.
मागिल अनेक दिवसांपासून कुरणखेड गांवात, सार्वजनिक कचर्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.परिणामी गांवातील अस्वच्छते मुळे साथीच्या व विषाणू संक्रमीत आजारांची, लागन होण्याची भीती निर्माण झाली होती. या अस्वच्छते बाबत ग्रामपंचायत कडे विचारणा केली असता,या कामांसाठी ग्रामपंचायत मध्ये निधीचा अभाव असल्याचे सांगण्यात आले.
आपले गांव स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाचा संकल्प या गांवातील युवकांनी घेतला.यासाठी त्यांना ड्रीम व्हिलेज फौंडेशनची साथ मिळाली.गांव कायम स्वरुपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले.गांवात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी,१५आॅगष्ट स्वातंत्रदिनाचा मुहूर्त साधण्यात आला.या दिवसी गावातील युवकांनी गांव स्वच्छ केले.स्वच्छता मोहीमेतून गाव स्वच्छ झाले.परंतू कचर्याची विल्हेवाट व रोजच्या निर्माण होणाऱ्या कचर्याचे काय? हा यक्ष प्रश्न कायमच होता.
यासाठी ड्रीम व्हिलेज फौंडेशनने पुढाकार घेऊन, घंटागाडी व कचराकुंड्या विकत घेण्याची कल्पना गावकऱ्यां समोर ठेवली.या साठी पन्नास टक्के अर्थसहाय्य मदत म्हणून फौंडेशनने देण्याचे,व उर्वरित रक्कम गावकर्रांनी वर्गणी व्दारे जमा करावी.असा विचार गावकर्यांन समोर ठेवला.ही कल्पना गावकऱ्यांना आवडली.त्यांनी तातडीने वर्गणी गोळा करून,युवकांच्या स्वाधिन केली.निधी जमा होताच फौंडेशन कडून, घंटागाडी व कचराकुंड्या कुरणखेड गांवाला पुरविण्यात आल्या.त्यामुळे कुरणखेड गावाचा कचरा गोळा करण्याचा व कचर्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघाला आहे.या मदती मुळे उत्साहीत होऊन, गावांतील युवकांनी गांव सदैव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
कुरणखेड गांवात या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी, शंतनु देशमुख,संगम जावरकर, अभिजित चौधरी, ऋषिकेश तायडे,अथर्व देशमुख,अभय पाथरे,अजय राऊत,राम देशमुख, ऋषिकेश पाथरे,अमय जावरकर,महेश देशमुख, कार्तिक देशमुख,वेदांत तायडे,अभय राऊत,तनय देशमुख,इत्यादींनी परिश्रम घेतले.