स्कॉड च्या धडक कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणारे अनेकजण  शांत तर रात्रीची वाहतूक आली सायंकाळी,

0
487
Google search engine
Google search engine

स्कॉड च्या धडक कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणारे अनेकजण  शांत

तर रात्रीची वाहतूक आली सायंकाळी,

चांदुर बाजार :-

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांनी एकदा पुन्हा अवैध धंदे वर आळा घालण्यासाठी वेगळी युक्ती लावत एक स्थानिक गुन्हे शाखेच्या व्यतिरिक्त त्याचे स्वतःचे पथक तयार केले असून हे पथक यशस्वी कार्यवाही मुळे अवैध धंदे वर बऱ्यापैकी आळा घालण्यात पोलिसांना यश आले.

तर दिनांक 18 ऑगस्ट च्या सकाळ च्या सुमारास विशेष पथक याना मिळालेल्या माहिती च्या आधारे त्यांनी
पोस्टे चांदूर बाजार येथे प्रोव्ही.रेड केली असताआरोपी नामे – *१) आकाश सरदार गडलिंग वय 22 वर्ष राहणार कोडविहीर ता. चांदूरबाजार त्यांचे ताब्यातून बॉबी कंपनीची संजीवनी कंपनी देशी दारू 6पेट्या किं 18000/-₹, व एक पांढऱ्या रंगाची मारुती 800 क्रमांक एम एच 29 सी 1232 किं. अंदाजे 70000/-₹ असा एकुण कि अंदाजे 88000/- रू.* चा मुद्देमाल मिळून आला.सदरचे आरोपी आणि मुद्देमाल पोलीस स्टेशन चांदूर बाजार चे ताब्यात देण्यात आले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉ. हरी बालाजी एन यांचे मार्गदर्शनातसपोनि अजय आकरे ,पोना रवीद्र बावणे,नापोका सय्यद अजमत,नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे,पोलीस स्टेशन चांदूरबाजार स्टाफ पोहेका विनोद बोबडे पोका मंगेश मस्केचालक पोका वसीम शहा यांनी केली.

चौकट :-
ज्या अवैध देशी दारूची वाहतूक रात्रीला होत होती ती आता सायंकाळी होत असून वाहतूक साठी महागाई किंमत च्या गाड्या वापरल्या जात आहे.यामध्ये स्विफ्ट,डस्टर,होंडा सिटी,विना क्रमांक मोटरसायकल, ओम्नी,एफझेड,या सारख्या वाहनाचा उपयोग होत आहे.