*40 गौवंश यांची जिवंत सुटका,दोन आरोपीला अटक* *शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही*

0
1253
Google search engine
Google search engine

*40 गौवंश यांची जिवंत सुटका,दोन आरोपीला अटक*

*शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही*

 

चांदुर बाजार:-

महाराष्ट्र मध्ये गौवंश हत्या,बंदी असताना अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर हा कायदा फक्त कागदावर असल्याचे चित्र आहे. आज दिनांक 19 ला रात्री च्या शिरजगाव कसबा पोलिसांनी अश्याच 40 गौवंश यांची जिवंत सुटका करत 2 आरोपींना अटक केली.

शिरजगाव कसबा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे करजगाव ते अंबाडा रोडवर नाका बंदी करून केली आणि पायदळ येत असलेल्या जनावर ची चौकशी केली असता कुठल्याही माहिती मिळाली नसल्याने पोलिसांनी मो.साबीर मो.हनिफ वय 33 वर्ष रा भट्टीपुरा,मो.अस्लम अब्दुल रहेमान वय 28 वर्ष रा.कुरेशीपुरा करजगाव याना ताब्यात घेतले असून त्याचे साथीदार पोलीस यांची चाहुल लागताच पळून गेले.

सदर जनावर यांची मोजणी केली असता एकूण 40 गौवंश असून त्यात गाय, बैल,कालवड असे दिसून आले.यामध्ये काही गौवंश ही जखमी सुद्धा झाली.त्यांना नागरिकांच्या साहाय्याने तळेगाव मोहना येथील गौरक्षण येथे पाठविले असून पोलिसांनी या कार्यवाही मध्ये मोबाईल सह एकूण अंदाजित किंमत 4 ,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर त्याच्यावर विविध कलम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

ही कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन ,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे,अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्यय शिरजगाव कसबा,पोलीस हेड कॉस्टबल संजय तायडे,विठ्ठल मुंडे,पोलीस नाईक पुरुषोत्तम माकोडे,सूरज भेले,पोलीस स्टेशन खुफिया अंकुश अरबट,पोलीस शिपाई प्रवीण ठाकरेयांनी केली.