*‘पीएमपीएल’च्या चालक पदासांठी माजी सैनिकांना अर्जाचे आवाहन*

0
608
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 4 : पुण्याच्या शहर बससेवेत (पीएमपीएल) वाहनचालक पदासाठी माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांकडे बस चालविण्याचा ग्राह्य परवाना व बिल्ला आहे आहे, त्यांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने (0721- 2661126) केले आहे.

या पदासाठी 18 हजार प्रतिमाह वेतन व पाच हजार प्रोत्साहन भत्त्याची तरतूद आहे. त्याशिवाय, राहण्याची सोयही करण्यात येईल, असे सैनिक कल्याण कार्यालयाने कळवले आहे.

000