अमरावती ब्रेकिंग :- सामाजिक वनीकरण विभागाचे DFO ने 5 लाखाची मागितली लाच – 2,50,000/- रू लाच स्वीकारताना अटक

0
6288
Google search engine
Google search engine

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र बोंडे यांना आज 5 लाखाची लाचेची मागनि वरून  पहिला टप्पा 2,50000 रुपये घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे , तक्रारदाराचे वरिष्ठ अधिकारी असून तक्रारदार यांना सामाजिक वनीकरण , वरुड जिल्हा अमरावती येथील अतिरिक्त कार्यभार दिल्याचा मोबदला म्हणून विभागीय वन अधिकारी यांनी तक्रारदाराला 5,00,000/- रु लाचेची ची मागणी केली. आज
पडताळणी दरम्यान पंचांसमक्ष 5,00,000/- रु मागणी करून दोन टप्प्यांमध्ये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले व आज रोजी ACB सापळा कारवाई दरम्यान पहिला टप्पा 2,50,000/- रू लाच स्वीकारताना समक्ष मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पो स्टे गाडगेनगर अमरावती येथे सुरू आहे.. सदरची कारवाई पथक – पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन पडघन,
पो हे कॉ. चंद्रशेखर दहिकर, नापोशि सुनील वऱ्हाडे, पोशि अभय वाघ, चालक नापोशि चंद्रकांत जनबंधू
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , अमरावती. यांचा समावेश होता