नो मास्क नो राईड मोहिमेत मास्क न घालणाऱ्या 204 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

0
1253
Google search engine
Google search engine

आकोलाःप्रतिनिधी

शहर वाहतूक शाखेने मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या 204 चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली.गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, जठारपेठ चौक, रतनलाल प्लॉट चौक येथे मोहीम राबवून मास्क न घालता दुचाकी चालविनाऱ्या 204 वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली,

सदर मोहीम शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यानी केली, दुचाकी चालक, ऑटो चालक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी स्वतः मास्क घालावे व विना मास्क ची प्रवासी वाहतूक करू नये आढळून आल्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना दिला आहे।