*जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू मंगळवारी करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी*

0
998
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १९ : जलसंपदा, कामगार व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे उद्या मंगळवारी (२० ऑक्टोबर) सकाळी १० वाजतापासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन शेती नुकसानाची पाहणी करणार आहेत.
राज्यमंत्री श्री. कडू हे जनुना, टिमटाळा, खिरसाना, निरासना, सवानेते, मोकळ आदी विविध गावांना भेटी देणार आहेत. यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी ते करणार आहेत.
०००