आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून गाव विकासासाठी शासनाने काढला शासन निर्णय ! 

0
1373
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून गाव विकासासाठी शासनाने काढला शासन निर्णय !
डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केले अभिसरण !
आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले शासनाचे आभार !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
लॉकडाऊनमुळे उद्योग व व्यापारावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून रोजगारनिर्मिती करण्याची, मोर्शी वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्राची वाहतूक करण्यासाठी व शेतीमध्ये जाण्यासाठी पांदण रस्त्यांची कामे करणे महत्वाचे असल्यामुळे खडीकरण व डांबरीकरनाची कामे करणे, एमआरजीएस अंतर्गत अभिसरणात येणारी २८ कामे शासनाच्या नियमानुसार त्यांचे आमदार निधी अंतर्गत अभिसरण करून ते कामे पूर्ण करण्याची संकल्पीय सकारात्मक चर्चा आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर नायक यांच्यासोबत केली होती शासनाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजुर कामांना मग्रारोहयो (अभिसरन) अंतर्गत कामांना प्रशासकिय मान्यता मंजुरात प्रदान करण्याबाबत शासनाने शासन निर्णय काढला .
     त्यामध्ये मोर्शी वरुड तालुक्यातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत एकुन मंजुर २५ कामांना रुपये १५० लक्ष मंजुरी प्राप्त करण्यात आली होती . या सर्व कामांना  जिल्हा व राज्य स्तरीय योजनेतून मंजूर कामे ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी सांगड घालून करण्याचे धोरण निश्चीत करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली होती.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेची दखल महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेऊन महत्वपूर्ण शासन निर्णय काढून त्यामध्ये अभिसरण नियोजन आराखाड्यामध्ये २८ प्रकारच्या कामांचा समावेश सुध्दा करण्यात आलेला आहे. संदर्भिय शासन निर्णय क्र. १  शासननिर्णय क.सावियो- २०२०/प्र.क्र.-३६/अजाक, दि. २६ मार्च,२०२० अन्वये  मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकास कामे ही संदर्भिय शासन निर्णय क्र. २ शासननिर्णय क्र.मग्रारो-२०१८/प्र.क्र.१३८/मग्रारो-१ दि.०५/ नोव्हें.२०१८ मधीलमग्रारोहयो अभिसरण नियोजन आराखड्यामध्ये अंतर्भूत २८ प्रकारच्या कामांशी सांगड घालून विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी करण्याबाबतच्या आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सद्य:स्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २६० कामांचे संयोजन अनुज्ञेय असून या कामांपैकी २८ कामांमध्ये विविध विभागांच्या योजनांसोबत अभिसरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार  शासन निर्णयातील अमरावती जिल्ह्यातील मंजूर कामांपैकी काही कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अभिसरण  करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने  महत्वपूर्ण निर्णन घेऊन रोजगाराच्या दृष्टिकोन लक्ष्यात घेऊन , अभिसरण अंतर्गत सर्व कामे कामे करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाचे आभार मानले .
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष संकल्पनेतून शासनाने शासन निर्णय काढून मोर्शी वरुड तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सामाजिक विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अभिसरण करून वरुड तालुक्यातील जामगाव , पोरगव्हान, मोर्शी खुर्द, उदापुर, मोरचुंद, शहापूर, गाडेगाव, वंडली, टेंभूरखेडा, भापकी, जरूड, वाठोडा, गव्हानकुंड, बेनोडा, खडका, तिवासघाट, मोर्शी तालुक्यातील दापोरी, उमरखेड, पाळा, तरोडा, पिंपळखुटा (लहान), बऱ्हाणपूर, अष्टगाव, हिवरखेड, आष्टोली येथील विकास कामांना मान्यता मिळाली असून मोर्शी वरुड तालुक्यात या योजने अंतर्गत कामे केली जाणार आहे .