आमदार देवेंद्र भुयार यांच्या निर्देशामुळे मोर्शी येथे बसले स्पीड ब्रेकर !

0
1022
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांच्या निर्देशामुळे मोर्शी येथे बसले स्पीड ब्रेकर !
मोर्शी शहर सुधार समितीने आमदार देवेंद्र भुयार यांचे मानले आभार !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
मोर्शी शहरात वाहतूक यंत्रणा कोलमडली असल्यामुळे तसेच वाहतुकीवर अंकुश नसल्यामुळे अंधाधुंद वाहने चालविणार्‍या वाहनचालकांमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. यावर प्रशासनाने अंकुश लावावा तसेच आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसवावे अशी मागणी मोर्शी शहर सुधार समितीतर्फे  आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली होती.  मोर्शी येथील जयस्तंभ चौक ते महाराष्ट्र कॉलनी तसेच छत्रपती शिवाजी चौक सिंभोरा रोड ते नरिमन पॉईंट या मार्गावर भरधाव येणार्‍या-जाणार्‍या वाहनाने अनेक युवक व नागरिक अपघात होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहे यापुढे अश्या घटना घडू नये म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोर्शी येथे  स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश दिल्यामुळे मोर्शी येथे तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात आल्यामुळे मोर्शी शहर सुधार समितीचे  संदीप रोडे, अंकुश ठाकरे, सोपान कनेरकर, शेखर चौधरी,  नितीन पन्नासे, प्रमोद दंडाळे, हितेश साबळे, राजेश ठाकरे, अंकुश घारड, गजानन वानखडे, राहुल श्रीराव, सागर ठाकरे, राजेंद्र साठवणे, रुपेश मेश्राम, निलेश लायदे, रुपेश वाळके,  हितेश साबू, अमित ठाकरे, वैभव राऊत, प्रदीप इंगळे, आकाश पोटे, मनीष येवले, अभि व्यवहारे, हरीश नासरे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले .