व्यायामाचे धडे,विविध स्पर्धा आयोजित करून नवरात्री उत्सव साजरा.

0
294
Google search engine
Google search engine

मॉं जिजाऊ व्यायाम प्रशिक्षण मंडळ यांचा पुढाकार

अकोटःप्रतीनिधी

श्री संत गजानन महाराज मंदिर द्वारा संचालित मॉं जिजाऊ व्यायाम प्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने यंदाची नवरात्री कोरोना परिस्थिती लक्षात घेता कमी संख्येत विविध उपक्रम आयोजित करून नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी  विद्यार्थ्यांनमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व्हावा सकारात्मक जिवन पद्धती ,वक्तृत्व स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,रांगोळी च्या माध्यमातून कोरोना जनजागृती,महिला सक्षमीकरण, माझे कुटुंब माझी जबादारी,वाचन संस्कृती टिकविण्यासाठी विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम या नवरात्री मध्ये राबविले जात आहेत.

यावेळी प्रास्ताविक पर मनोगत माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी केले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हरिनारायन माकोडे नगराध्यक्ष अकोट न.पा., तर मंचावर प्रदीप खोटरे,प्रभूदास तळोकार, भगवान टेकाडे उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.ऋतुजा सोळंके, द्वितीय कु.गौरी मानखैर तर तृतीय कु.कृष्णाली पाथ्रीकर,तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कु.वैष्णवी मानखैर,द्वितीय क्रमांक कु.गायत्री तळोकार, तृतीय क्रमांक पियुष सोळंके व रोहित काकड,वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक कु गायत्री तळोकार,द्वितीय क्रमांक वैष्णवी मानखैर,तृतीय क्रमांक आयुष सोळंके,तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक निशा टेकाडे द्वितीय पियुष सोळंके तर तृतीय क्रमांक वेदिका कतोरे तर हंडीफोड या स्पर्धेत प्रथम कु निशा टेकाडे द्वितीय गौरी सोळंके, तृतीय धनश्री हिंगणकर यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोपान लोखंडे, साहिल वसू, पियुष खंडेराय,ओम टेकाडे संदीप गोंडागरे,दर्शन मावळे, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन परीस संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत तळोकार यांनी तर आभार प्रदर्शन सिमा चौखंडे यांनी केले.