संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी ताकद उभा करू रणजीतसिंह पाटील : अकलूज मध्ये पदवीधरांचा भव्य मेळावा

0
492
Google search engine
Google search engine

लहान

सांगली/ कडेगांव:
पुणे विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाकडून अतिशय ताकदीचा अनुभवी आणि पदवीधरांना न्याय देऊ शकणारा उमेदवार म्हणजेच संग्रामसिंह संपतराव देशमुख यांची योग्य निवड केली आहे. आमची सगळी ताकद देशमुख यांच्या पाठीशी उभा करणार असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आमदार रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. ते अकलूज ( जि. सोलापूर) येथे आयोजित भव्य पदवीधर मेळाव्यात बोलत होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, श्रीकांत देशमुख, प्रकाश पाटील, बाजीराव काटकर हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. रणजीतसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने देशभर विजयाचा झेंडा फडकलेलाच आहे. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुका किंवा इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये देखील भाजपने बाजी मारली आहे, यातून मतदारांच्या मनात भाजप आहेच, शिवाय संग्रामसिंह देशमुख यांच्यासारख्या ताकदीचा उमेदवार पदवीधरांना मिळाल्याने आता त्यांच्या विजयाबाबत कोणतीही शंका राहिलेली नाही, ते नक्की विजय होतील आणि त्यांच्या कारकिर्दीत ते खूप जोमाने काम करतील असेही माझा विश्वास आहे.

यावेळी पुणे विभाग पदवीधर भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख म्हणाले, आमच्या कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसा आहे, तोच मी चालविण्याचा प्रयत्न केला. याचीच दखल घेऊन पक्षाने मला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळाली, याच संधीचा लाभ घेऊन विकास कामे केली. जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष म्हणून युवकाना शेतीसह इतर व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिली, महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिली, लहान मोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य करू शकलो.
भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या एका लहानशा कार्यकर्त्याला संधी दिली आहे, त्या संधीचा मी निश्चित स्वरूपाने या पाचही जिल्ह्यांमधील पदवीधरांचे संघटन करून त्यांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणे, हे माझे उद्दिष्ट असेल, त्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित पदवीधरांना दिला.

यावेळी बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, डॉ. पूनम राऊत, सोपानकाका नारणवर, शशिकांत चव्हाण, संजय देशमुख, मुक्तार कोरबू आदींसह इतर पदाधिकारी, पदवीधर मोठ्या संख्येत उपस्थित होते.