ग्रामसेवक ,तलाठी,शिक्षक यांनी केली शासनाची फसवणूक

0
944
Google search engine
Google search engine

ग्रामसेवक ,तलाठी,शिक्षक यांनी केली शासनाची फसवणूक

गोपाल  भालेकर यांनी चांदुर बाजार पोलीस स्टेशन ला दिली तक्रार

चांदुर बाजार:-

                स्थानिक पातळीवर काम करणारे ग्रामसेवक, तलाठी,शिक्षक, आरोग्य सेवक ,वैदयकीय अधिकारी यांनी ज्या ठिकाणी नेमणूक आहे त्या ठिकाणी मुख्यलयीन राहणे बाबत वारंवार शासनाने निर्देश दिले.मात्र ग्रामीण पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात आहे.भरमसाठ पगार असताना अधिकारी यांना मुख्यलयीन राहणे बंधनकारक असताना ते मुख्यलयीन राहत नाही.त्यामुळे याचा त्रास सामान्य जनतेला होतो.मात्र घरभाडे दर महिन्याला घेण्यात येते या मध्ये खोटे दस्तऐवज तसेच खोटी माहिती देऊन घरभाडे घेणाऱ्यांवर कार्यवाही साठी लोकविकास संघटनेचे अध्यक गोपाल भालेकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्यधिकारी आणि तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या पुराव्या सहित तक्रार केली होती.मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी शासनाची फसवणूक करणारे आणि त्यांना मदत करणारे यांच्या गुन्हा दाखल करून कार्यवाही साठी चांदूर बाजार पोलीस स्टेशन ला 23 नोव्हेंबर ला तक्रार दिली आहे.

              नेमणूक असलेल्या ठिकाणी भाड्याने राहत असताना करारनामा तसेच ग्रामसभेचा ठराव घेणे आवश्यक आहे.मात्र ग्रामसेवक ,तलाठी,शिक्षक आणि आरोग्य सेवक हे मुख्यलयीन न राहता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाण वरून उपडाऊन करतात.त्यामुळे ते पूर्णवेळ आपल्या कार्यालयात राहतच नाही जर सामान्य माणसाला काम पडले तर तालुक्यावर येण्याचा सल्ला दिला जातो.मात्र मग त्यांना घरभाडे भत्ता का द्यावा अशा प्रश्न गोपाल भालेकर यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी दाखल केलेल्या तक्रार मध्ये अनेक ग्रामसेवक आणि आणि तलाठी यांनी फक्त स्वतः लिहिलेला एक कागद देऊन आज पर्यत घरभाडे वसूल केले असल्याचे स्पस्ट होते आहे.तर तलाठी याना ज्याच्या घरी ते राहत आहे त्यांचे पूर्ण नाव देखील माहिती नाही.तक्रार करून देखील वरिष्ठ यांनी काहीच दखल घेण्यात आली नसल्याने भालेकर यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली आहे.

प्रतिक्रिया
मागील 3 महिन्यापासून तलाठी,शिक्षक, ग्रामसेवक मुख्यलयीन राहण्याबाबत चे पुरावे गोळा करुन त्याची रीतसर तक्रार जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी जिल्हा परिषद अमरावती,तहसीलदार चांदुर बाजार,गटविकास अधिकारी यांच्या तक्रार केली मात्र त्यांनी दखल घेतली नाही.त्यामुळे या सर्व प्रकाराला ते देखील कोठे जबाबदार असल्याचे लक्षात आल्याने दिनांक 23 नोव्हेंबर चांदूर बाजार पोलीस स्टेशन ला फसवणूक च्या गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
1)गोपाल भालेराव लोकविकास संघटना

भालेराव यांची तक्रार प्राप्त झाली याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राहाटे यांच्या देण्यात आला आहे.याबाबत मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्या सोबत पत्र व्यवहार करून सत्यता पडताळून कार्यवाही केली जाईल.
2)सुनील किंगणे पोलीस निरीक्षक चांदुर बाजार

बॉक्समध्ये
घराचा उपयोग जर व्यवसाय करण्यासाठी होत असेल तर त्याच्यावर व्यवसायिक कर लावणे आवश्यक असते ग्रामविकास अधिकारी, तलाठी,शिक्षक हे ज्या घरी राहत आहे त्याच्या करत व्यवसाय कर लावला की नाही याचा देखील तपास पोलिसांना करावा लागेल.