आकोट मध्ये कोवीड योध्दा चित्रपटाचा  प्रिमिअर सोहळा संपन्न

0
819
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

शिव छत्रपती साम्राज्य ग्रुप आणि गुरु माऊली फिल्म प्रस्तुत संतोषकुमार खवले निर्मित दीपक गोरे दिग्दर्शित हम है कोवीड योध्दा या शॉर्ट फिल्म चे प्रीमियर सत्याविजय टॉकीज अकोट येथे करण्यात आला.या शोस अकोट शहरातील शेकडो प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली

.कोरोना काळात ज्या शिक्षक,समाजसेवक, जनसेवक,डॉक्टर,पत्रकार ,पोलिस,सफाई कामगार,तहसील कार्यालय यांनी गरजूंना मदत केली त्यावर आधारित या चित्रपटाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे अधेक्ष स्थानी विजयकुमार झुनझुनवाला,तर प्रमुख अतिथी म्हणून ना. तहसीलदार राजेश गुरव,अकोट ग्रामीण चे ठाणेदार श्री. ज्ञानोबा फड साहेब,psi अनुराधा पाटेखेडे मॅडम,ना.त.हरीश गुरव ,विजय शिंदे,चंचल पितांबर वाले, मायाताई म्हैसने, श्री. दिपक गोरे ,नरेंद्र काकड,अचल बेलसरे,विशाल भगत,राजे संभाजी अकॅडमी चे राजीव खरोडे सर उपस्थित होतेचित्रपटातील मुख्य कलाकार आशिष भटकर,आदित्य पाटील,सुमती इंगळे,राजेश पाटील ,समृध्दी इंगळे,संतोष झामरे,विष्णु झामरे ,आसावरी पाटील प्रमुख उपस्थिती होती.त्या आधी शिव छत्रपती साम्राज्य ग्रुप तर्फे सर्व कोविड योध्दा यांचा सत्कार करण्यात आलाकार्यक्रमाचे शेवटी निर्माता संतोषकुमार खवले यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.प्रवीण बोंद्रे,अमेरुन शहा,निकिता काशिदे,तुषार नवलकर,मिलिंद झामरे ,नितीन चिंचोलकर,रवी भाऊ शिंदे आणि सत्याविजय टॉकीज चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.