अमरावती विद्यापीठाचा श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार चांदूर रेल्वेच्या “वॉटरमॅन” ला जाहीर

0
597
Google search engine
Google search engine

 

*चांदूर रेल्वे – एंकर*

अनोळखी वाटसरूंना थंडगार पाणी पाजण्याचा अजब छंद अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापुर येथील विवेक उर्फ राजू वासुदेवराव चर्जन या शेतकऱ्याने मागिल अनेक वर्षापासुन जोपासला आहे. हा “वॉटरमॅन” पक्षींसाठी सुध्दा पाण्याची सोय करीत निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहे. याचीच दखल घेऊन विवेक चर्जन यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार 2020’ जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे शुभहस्ते प्रदान केल्या जाणार आहे.

*VO-*

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने स्व.द.ना. उपाख्य बबनराव मेटकर यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृति प्रित्यर्थ ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार’ 2020 यावर्षी संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार कार्य करणारे समाजसेवक चांदूर रेल्वे तालुक्यातील असलेले विवेक वासुदेवराव चर्जन यांना घोषित झाला आहे. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शॉल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदी झाल्या आहे.