*सरस्वती कला महाविद्यालय दहीहंडा येथे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न ;- रोग निदान शिबिराचां ग्रामस्थांनी घेतला लाभ..*

0
526
Google search engine
Google search engine

दहीहंडा प्रतिनिधी :
कर्मयोगी अप्पासाहेब प्रतिष्ठान संचालित संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित सरस्वती कला महाविद्यालय दहिहंडा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ओमप्रकाशजी दाळु, उद्घाटक महेश गावंडे ठाणेदार पोलीस स्टेशन दहीहंडा प्रमुख पाहुणे दिवाकरदादा गावंडे संस्था व्यवस्थापक,
प्रमुख उपस्थितीत म्हणून उपसरपंच अजीमोदीन ,सर मो.इद्रिस भाई डॉ.नासीर खान, सुनील पोटे,राजीव बोंडे, डॉ नासिर खान गोविंद झाडे,सतीश निमकार,दिनेश डहाके,शोभित आठवले बाबुराव आठवले, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर यावले डॉ.दीपक राऊत, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विचारपीठावर उपस्थित होते .
सर्वप्रथम गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा डॉ.दीपक राऊत करतांना म्हणाले की, दहीहाडा हा परिसर खारपान पट्ट्यातील महत्वाचा ग्रामीण भाग आहे . या ग्रामीण भागातील परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणनुसार असे आढळून आले की, या भागात किडनी विकार,दमा, छाती ,पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत असून या संदर्भात समाजात जागृती होण्यासाठी आणि जनतेचे आरोग्य जपण्यासाठी रोग निदान शिबिराचे आयोजन केले पाहिजे त्यादृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केले .
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना ठाणेदार महेश गावंडे म्हणाले की, परिसरातील तरुणांनी आणि जागृत नागरिकांनी व्यसनाधीन ते पासून आपण वेगळे झालो पाहिजे, व्यसनाची कास सोडली पाहिजे .आपले आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टिकोनातून नियमित शरीराचे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ओम प्रकाश दाळू म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा दृष्टिकोनातून महाविद्यालयांमध्ये रोग निदान शिबिर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन केले.
या रोग निदान शिबिरात अकोला ,अमरावती ,नागपूर येथील विविध तज्ञ डॉक्टरांनी रोगनिदान शिबिरामध्ये सहभाग दर्शविला त्यामध्ये डॉ .अभय जैन किडनी विकार तज्ञ, डॉ अमोल रावणकर अस्थीरोग तज्ञ , डॉ मतीन शेख ,दमा तज्ञ,डॉ. ऐहतेशान देशमुख मधमेह तज्ञ,डॉ पराग डोईफोडे कान, नाक ,घसा तज्ञ,डॉ संदीप मानकर बालरोग तज्ञ ,डॉ सुनील तारोळे पोटविकर तज्ञ डॉ असिफ हालारी दंत रोग तज्ञ, डॉ परवेझ खान बालरोग तज्ञ डॉ शिव अग्रवाल शिशु तज्ञ, डॉ राजरत्न पाटील
नेत्र रोग तज्ञ,डॉ जिया खान रक्त लघवी तज्ञ डॉक्टर इत्यादी नामवंत तज्ञ , डॉ. नासिर खान सहभागी झाले होते .
या रोग निदान शिबिरात ब्लड,शुगर हिमोग्लबीन तपासणी सुद्धा करण्यात आली . या रोग निदान शिबिरामध्ये विविध आजारावरील 500 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते .
सर्वच नागरिकांनी आपआपल्या आजाराच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तज्ञांकडून मार्गदर्शन घेत आजाराबद्दल माहिती करून समाधान व्यक्त केला असल्याचं मत प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर यावले यांनी व्यक्त केल.
सरस्वती कला महाविद्यालयाच्या वतीने रोगनिदान शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ सागर नारखेडे, प्रा.विजय आठवले डॉ.योगेश वडतकर, डॉ प्रशांत ठाकरे, डॉ गणेश पोटे
प्रा. दिवाकर सदाशिव,नंदकिशोर दाळु, संदीप दाळु, विवेक कमजदर ,नंदकिशोर बोंद्रे ,चंचल ठाकरे अरुण वाकोडे, अब्दुल बाकिर, चंद्रशेखर चव्हाण यांचे सह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय आठवले आभार डॉ. गणेश कुटे यांनी मानले.