विकेंड लॉकडाउन ला देखील चक्क हॉटेल समोरच नास्ता चा आस्वाद घेत आहेत ग्राहक – प्रशासनाच दुर्लक्ष

0
1299
Google search engine
Google search engine

हॉटेल व्यावसायिकांना फक्त पार्सल ची परवानगी

चांदुर बाजार :-11/04/2021 –
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा आदेश काढणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात राज्यातील व्यापारी संघटनेने बंडाचे निशाण फडकावले आहे. चांदुर बाजार शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला अनेक व्यापारांनी कडाडून विरोध करीत आपआपली दुकाने अर्ध्या शटर वर उघडली आहे तर शासनाने आखून दिलेल्या नियम हि पायदळी तुडविले असल्याचे चित्र चांदुर बाजार शहरात पाहवयास मिळाले शहरात हॉटेल व्यावसायिकांसाठी केवळ पार्सल सुविधा देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे त्यातही विकेंड लॉकडाउन ला 2 दिवस हॉटेल बंद चे ही आदेश आहेत मात्र शहरातील बस स्थानकाजवळील चौकातील एका हॉटेल समोरच नागरिक आज सकाळी नास्ता करतांना दिसून आलेत सध्या आर्थिक चक्र सुरु राहण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे आहे मात्र अश्या बेजवाबदार व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अश्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे