*चांदूर बाजार शहरात १८ वर्षा वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र त्वरित सुरू करा – भाजपची जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे मागणी*

0
469
Google search engine
Google search engine

 

*ग्रामीण मधे प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय पण चांदूर बाजार शहरात केंद्र नाही*

चांदूर बाजार शहरात १८ वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध होण्याकरिता त्वरित केंद्र सुरू करण्याकरिता तालुका भाजपच्या वतीने मंडल अध्यक्ष मुरली माकोडे, नगरसेवक गोपाल तिरमारे, शहराध्यक्ष निलेश देशमुख यांनी वैद्यकीय अधीक्षक संध्या सालकर यांना भेटून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
चांदूर बाजार शहरात कोरोणाच्या दुसऱ्या लाटेमुळे महामारीचे वातावरण तयार झालेले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. अश्यात अद्यापपर्यंत शहरात शासकीय कोविड रुग्णालयाची व्यवस्था झालेली नाही त्यामुळे चिंतेचे वातावरण संपूर्ण तालुक्यात आहे. देशाचे पंतप्रधान यांनी १८ वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना १ मे पासून कोविड लसीकरण करण्याची घोषणा केली आहे व त्यानुसार लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरावात सुद्धा झाली आहे. महाराष्ट्र राज्यात लासिकरणाला सुरवात होवून अमरावती जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी या तिसऱ्या टप्प्याचा लसिकरणाला सुरवात झालेली आहे तसेच चांदूर बाजार तालुक्यात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरवात होवून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले आहे. परंतु चांदूर बाजार शहरात इतक्या मोठ्या संख्येत कोरोणाचा प्रादुर्भाव होत असताना सुद्धा तिसऱ्या टप्प्याच्या लसिकरनाला सुरवात झालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे एकीकडे वाढत्या करोणा मुळे मृत्यूचे संकट तर दुसरीकडे लसिकरनाला अद्याप सुरवात न होणे त्यामुळे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांमध्ये प्रशासनाचे विरुद्ध रोष वाढत चालला आहे. करीता चांदूर बाजार शहरात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस नगरसेवक गोपाल तिरमारे तसेच भजप शहराध्यक्ष निलेश देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक यांना देवून मागणी केलेली आहे.