*ती पोस्ट बेकायदेशीर* नागरिकांनी विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन *अनाथ मुलांना दत्तक घेणेबाबत व्हायरल पोस्टमुळे संभ्रम*

0
1352
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ६ : देशामध्ये कोरोनाच्या सावट मोठ्याप्रमाणात पसरल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक मूल मुलीच्या डोक्यावरील छत्र गमावले आहे, अशा अनाथ मुली दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्यासाठी सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याद्वारे दत्तक मुले हवी असल्यास संपर्क साधण्याचे कळविले जाते. मात्र ही बाब बेकायदेशीर असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास, अधिकारी अतुल भडंगे यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये कोरोना आजाराने दोन मुलीचे आईवडील दोघेही मरण पावले आहेत. ते अनाथ असल्याने त्यांना दत्तक घेण्यासाठी मोबाईल क्रमांकवर संपर्क साधण्याचा कळविले आहे,
एक मुलगी 3 तर दुसरी 6 दिवसाची असल्याचे संदेशात नमूद आहे.

अवैधरित्या सामाजिक प्रसारमाध्यमाचा उपयोग करून मुले परस्पर दत्तक देणाऱ्या व्यक्तीबाबत कारवाई करण्यात येत आहे. तसेच केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी याबाबत पत्र दिले आहे.

महाराष्टातील अनेक जिल्ह्यातून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली मुले दत्तकासाठी उपलब्ध आहेत असे संदेश फेसबुक व व्हाट्सअप वर फिरत आहेत, परंतु हे संदेश चुकीचे आहे आणि अशा प्रकारे बालके दत्तक दिली जात नाहीत, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता अशा प्रकारे कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला आणि कोणीही नातेवाईक बालकास स्वीकारण्यास तयार नसेल तर अशा बालकाना छत्र मिळवून देण्यासाठी 8308992222/ 7400015518 या हेल्पलाईनला सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संपर्क क्रमांकावर करावा किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
अशी बालके आढळून आल्यास त्यांची माहिती द्यावी जेणेकेरून बाल कल्याण समितीच्या सहकार्याने त्यांना योग्य ठिकाणी छत्र मिळू शकेल, असे आवाहन श्री. भडंगे यांनी केले आहे.