महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील १४ मे च्या लसिकरणाबाबत माहिती

0
4807
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी, –
महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील ४५ वर्ष व त्‍यापेक्षा जास्‍त वयोगटाकरीता ज्‍या नागरिकांचा कोविड १९ अंतर्गत कोविशिल्‍ड या लसीचा पहिला व दुसरा डोज घ्‍यावयाचा राहीलेला आहे अशा नागरिकांनी खालील लसिकरण केंद्रावर जावून कोविशिल्‍ड या लसीचा डोज घ्‍यावा. पहिल्या डोज करीता ५० कूपन तर दुसऱ्या डोज करीता १५० कूपन सकाळी ७ वाजता वाटण्यात येणार आहे. खाली नमुद लसिकरण केद्रांवरुन फक्‍त कोविशिल्‍ड लसीचा डोज सकाळी ९ ते ५ या वेळांमध्‍ये देण्‍यात येणार आहे.
१) मनपा दवाखाना मोदी हॉस्पिटल बडनेरा, २) मनपा दवाखाना भाजीबाजार, ३) यंग मुस्लिम सो.असो. नागपुरी गेट, ४) मनपा दवाखाना मसानगंज, ५) शहरी आरोग्‍य केंद्र महेंद्र कॉलनी, ६) दंत महाविद्यालय, ७) श्री. तखतमल श्रीवल्‍लभ होमिओपॅथिक कॉलेज व रुग्‍णालय ८) शहरी आरोग्‍य केंद्र दस्‍तुरनगर, ९) डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, १०) आयसोलेशन दवाखाना 11) शहरी आरोग्‍य केंद्र विलास नगर १२) मनपा दवाखाना बिछुटेकडी १३) मनपा दवाखाना सबनिस प्‍लॉट, १४) वसंत हॉल या केंद्रावर कोविशिल्‍ड ही लस उपलब्ध राहणार आहे.
नागरिकांनी वरिष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देवून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.