शहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्त्यव्या सोबतच सातत्याने देत आहेत प्रमाणिकतेचा परिचय ! गरीब कामगाराचा हरविलेला मोबाईल केला परत

0
1060
Google search engine
Google search engine

अकोला शहरात कडक लॉक डाऊन राबविण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेवर असते, जम्बो कारवाया करून ही जबाबदारी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पार पाडीत आहेतच परंतु त्या सोबत घाईगर्दीत जात असताना वाहन चालकांचे रस्त्यात पडलेले मोबाईल, पाकिटे, महत्वाची कागदपत्रे वाहतूक पोलिसांना सापडल्यावर ते विशेष प्रयत्न करून सदर चीजवस्तू असणाऱ्या मालकाचा शोध घेऊन सदर चीजवस्तू परत करून आपल्या प्रमाणिकतेचा सातत्याने परिचय देत आहेत।

आज अशोक वाटिका चौकात आपले कर्त्यव्य बजावीत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार कैलास सानप ह्यांना एक अँड्रॉईड मोबाईल रस्त्यात पडलेला दिसला परंतु सदर मोबाईल लॉक असल्याने मोबाईल मालकाचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत होती,तेवढ्यात सदर मोबाईल वर फोन आला व त्याने स्वतः चे नाव गणेश जोगदंड राहणार चांदुर असे सांगितले व सदर मोबाईल त्यांचा असल्याचे सांगितले व ते जेल चौकात उभे असून त्यांचे कडे वाहन नसल्याने अशोक वाटिका चौकात येऊ शकत नसल्याचे सांगितले, तेव्हा वाहतूक अंमलदार कैलास सानप हे स्वतः जेल चौकात गेले असता तेथे गणेश जोगदंड हे उभे असल्याचे दिसून आले,

त्यांची चौकशी केली असता त्यांची परिस्थिती हलाखीची असून ते एका प्रतिष्ठानवर कामगार असल्याची माहिती मिळाली व पैसे साठवून मोठ्या मुश्किल ने मोबाईल विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले खात्री करण्यासाठी त्यांना सदर मोबाईल अनलॉक करण्याचे सांगितले असता त्यांनी लगेच अनलॉक करून दाखविला, त्यांचे ओळखपत्र पडताळून सदर मोबाईल त्यांना परत केला असता त्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त केले।

कैलास सानप ह्यांचे प्रामाणिक पणा बद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व सर्व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अमलदारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।