मोर्शी येथे डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामध्ये ३५० रुग्णांची तपासणी ! 

0
1103
Google search engine
Google search engine
मोर्शी येथे डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामध्ये ३५० रुग्णांची तपासणी !
१११ रुग्णांच्या डोळ्यांची होणार नागपूर येथे शस्त्रक्रिया !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन  !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका व डॉ महात्मे नेत्रपीढी नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन १७ ऑगस्ट रोजी मोर्शी येथील शिवाजी कन्या शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या भव्य डोळे तपासणी व मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराला मोर्शी तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये ३५० रुग्णांची तपासणी करून मोतिबिंदू शस्त्रक्रिया व इतर नेत्ररोग विषयी सखोल मार्गदर्शन व निदान करण्यात आले .या शिबिरामध्ये ३५० रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी १११ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान करण्यात आले.
या शिबिराला महात्मे रुग्णालयाचे नेत्र तज्ञांनी आपली सेवा उपलब्ध करून दिली असून शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या
१११ नागरिकांना २० ऑगस्ट रोजी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया साठी नागपूर येथे पाठविण्यात येणार असून रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मे नेत्र पेढी नेत्र रुग्णालय नागपूर येथे नेत्र विकार असलेल्या रुग्णांना मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
या भव्य डोळे तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ मेघनाताई मडघे प्रमुख उपस्थिती डॉ प्रदीप कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, माजी न.प. उपाध्यक्ष मोहन मडघे,  शहर अध्यक्ष तमीज भाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, रुपेश मेश्राम, नगरसेविका सौ विद्या ढवळे, प्रतिभा महल्ले, दीक्षा गवई, सुनीता कोहळे, मयूर राऊत, स्नेहा जाने, विनोद ढवळे, शेर खा, दिलीप गवई, आनंद तायडे, देवेंद्र खांडेकर, पंकज राउत,अमर नागले, बंटी नागले, राहुले धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य डोळे तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न  झाले .