छत्रपती शिवाजी मैत्री संघ सालबर्डी तर्फे ८० वृक्षांची लागवड !   वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची हमी घेत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा 

0
815
Google search engine
Google search engine
छत्रपती शिवाजी मैत्री संघ सालबर्डी तर्फे ८० वृक्षांची लागवड !
वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची हमी घेत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा
रुपेश वाळके मोर्शी तालुका प्रतिनिधी /
           सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य श्रीक्षेत्र सालबर्डी येथे शिवाजी मैत्री संघटनेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगल तोड करण्यात आलेली आहे. तद्वतच रस्त्याच्या बाजूला असलेली विशाल महाकाय झाडे तोडण्यात आली. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे शिवाजी मैत्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रणीत राऊत यांच्या पुढाकाराने श्रीक्षेत्र सालबर्डी येथे पर्यावरणाला पोषक असणारे व माणसाच्या जीवनाकरिता सुद्धा आवश्यक असणारे वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ अशा विविध जातींच्या (80) झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली. फक्त वृक्षांची लागवडच नव्हे तर वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची हमी घेत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पाळा(सालबर्डी) चे सरपंच अजयभाऊ राऊत, उपसरपंच चपंतरावजी नेवारे,सागरभाऊ साठे (पो.पाटील),प्रशांतभाऊ राऊत,मुख्याध्यापक किशोर वैराडे सादिक पटेल (पो.पा.) सचिनभाऊ राऊत, अशोकभाऊ घोडघाम,नरेंद्रभाऊ सोनागोते,ओमप्रकाशजी निस्वादे,अंकीतभाऊ ठवळी, विनीत उबाळे,तुषारभाऊ इंगळे, अमोल निस्वादे,रुपेश झोड,सौ.शोभाताई सातपाने,सौ. निर्मलाबाई उईके,सौ. अरूणाबाई परतेती,सौ. निताताई दिलवार,सौ.मिराबाई ऊईके,सौ.प्रियंका धलवार,अजय परतेती,राकेश गोहिते,प्रियांशु हारोडे,कुंदन सातपाने,अखिलेश परिहार,रंजित उईके,अक्षय सुवारे,रुपेश गोहिते,हेमंत मानकर,सागर ठाकुर,अनिल मानकर,श्रीकांत हारोडे,प्रशांत राऊत,वैष्णव चिंचोळकर,मयूर कोहळेआकाश शिंगंरवाडे,निलेश धुर्वे,अजय वानखडे,नितेश गोडबोले,कपिल दंडाळे, यश पांडे,मयूर राऊत,सुशांत बीसांद्रे सह मित्र बांधव उपस्थित होते.