वर्धा नदीपाञात श्री क्षेत्र झुंज येथे एक होडी (नाव)उलटून 11 जण बुडाले …? – 3 मृतदेह सापडले

0
4899
Google search engine
Google search engine

घटनास्थळी SDM श्री हिंगोले, ठाणेदार सरकटे, व तलाठी दाखल


वरुड:

वर्धा नदीपाञात श्री क्षेत्र झुंज येथे एक होडी (नाव)उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे सद्या तिघांचे शव सापडले आहे त्यात गाडेगावचा नाव चालक, दोन वर्षाची लोणी येथील मुलगी, व एक गाडेगावची महिला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की आज दिनांक १४ सप्टेंबर ला दुपारी ११ वाजता झुंज येथे महादेव दर्शनाला जात होते  अशी प्राथमिक माहिती आहे
रेस्क्यु टिम येण्यापूर्वी गावातील लोकांनीच नदीपाञात मृतदेह शोधून काढले हे विशेष ,आणी इतर शव शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे घटनास्थळी एस डी एम नितिन हिंगोले, बेनोडा पोलिस स्टेशनचे ठाणेदाराचे सरकटे तलाठी एस के गोलवाल पोहोचले असुन तपास कार्य करीत आहे
शव बाहेर काढण्यासाठी रेस्कु चमुला पाचारण
 करण्यात आले आहे