तालुका अध्यक्षपदी पत्रकार नानासाहेब पाटील यांची निवड

0
248
Google search engine
Google search engine

*तालुका अध्यक्षपदी पत्रकार नानासाहेब पाटील यांची निवड*. *# जिल्हा उपाध्यक्षपदी संजय सोनोने*

शेगाव::—— तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असलेली आणि पत्रकारा आणि पत्रकारितेच्या उत्कर्षासाठी देशातील अग्रगण्य अशा 50 संपादकांनी एकत्र येऊन व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना स्थापन केली आहे. देशातील 17 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत असून संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे सह विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे व कार्याध्यक्ष अरुण जैन यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या शेगाव तालुका अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे पत्रकार नानासाहेब पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक सकाळ चे संजय सोनोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नानासाहेब पाटील यांनी पत्रकारित आपली वेगळी ओळख निर्माण करीत स्थानिक पत्रकार संघटनेत व तालुका पत्रकार संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या त्याची दखल व्हॉइस ऑफ मेडिया या संघटनेने घेत नानासाहेब पाटील यांना शेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्त केले. ज्येष्ठ संपादकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात ही संघटना कार्यरत असून सार्वजनिक जीवनात पत्रकारिता करताना येणाऱ्या समस्या व अडचणीचे निरासन ही संस्था करणार आहे ग्रामीण व शहरी भागात पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याकरिता ही संघटना कटिबद्ध असेल जिल्ह्यातील पत्रकारांनी संपूर्ण जिल्ह्यात ही संघटना कार्यरत करून १३ ही तालुक्यात संघटनेचे तालुकाध्यक्ष जाहीर झाले आहे. या माध्यमातून लवकरच 11 सदस्य तालुका कार्यकारणी जाहीर सुद्धा होणार आहे वाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल असा विश्वास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी व्यक्त केला आहे.