जत्रेत गॅसचा फुगा घेताना सिलेंडरचा स्फोट , एका लहान मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू ; आजोबा गंभीर जखमी 

0
2590
Google search engine
Google search engine

अमरावती : अचलपूर तालुक्यातील सिंधी बु च्या जत्रेत गॅसचा फुगा घेताना सिलेंडरचा भीषण असा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुगे घेण्यासाठी आलेल्या चिमुकलीचा पाय या स्फोटात धडावेगळा झाल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला होता. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे . तिचे आजोबाही स्फोटात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी जिल्ह्यातील अचलपूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सिंधी बुजरूक गावात जत्रा आयोजित करण्यात आली होती.