अवैध गांजा वाहतूक प्रकरणातील अटक चारही आरोपींचा पीसीआर ४ दिवसांनी वाढला , आरोपींना अमरावती न्यायालयात केले होते हजर

0
359
Google search engine
Google search engine

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

अवैध गांजा वाहतूक करणा-याविरूद्ध अमरावती गुन्हे शाखा, ग्रामिणच्या पथकाने चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गार्डन फाट्याजवळ कार्यवाही केली होती. या प्रकरणात अटक चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ४ दिवसांची वाढ केली आहे.

वृषभ मोहन पोहोकार, (वय २५ वर्षे, रा . रिद्धपूर ता . मोर्शी), विक्की बस्तिलाल युवनाते (वय २० वर्षे, रा. शिरजगाव कसबा ता. चांदूर बाजार), शेख अरबाज शेख ईलीयास, (वय १९ वर्षे, रा. आझाद नगर, अमरावती), शेख तौसिफ शेख लतीफ, (वय १९ वर्षे, रा. रतनगंज, खुर्शिदपुरा अमरावती) अशी अटकेत असलेल्या ४ आरोपींची नावे आहे. २ सप्टेंबर रोजी अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने चांदूर रेल्वे ते अमरावती रोडवरील मालखेड गार्डन फाट्याजवळील एका हॉटेलसमोर नाकाबंद करून पथकामार्फत वाहन थांबविण्यात आले. यावेळी एक आयशर ट्रक क्रमांक सीजी १२ बीई ५७६१  ची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ४३५.०५० किलाग्रॅम वजनाचा गांजा किंमत ५२ लाख २० हजार ६०० रू. तसेच आयशर ट्रक आणि सदर ट्रक चालकास माहीती देण्याकरीता पेट्रोलींग करणारे दोन वाहनांसहीत ईतर साहीत्य असा एकूण ७४ लाख २० हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक सर्व आरोपींना अमरावती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रथम ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. सदर प्रकरणात आणखी ४ आरोपींचा समावेश असुन त्यांचा शोध चांदूर रेल्वे पोलीस घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.