अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- मित्रानेच केली मित्राची हत्या, शवविच्छेदन अहवालानंतर झाला उलगडा*

0
7542
Google search engine
Google search engine

अमरावती :- चांदूरबाजार  – स्थानिक चांदुर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिलालपूर जवळील सोनोरी शेतशिवारात श्री सुरेंद्र पात्रे  यांचा शेतात संदीप भाकरे वय 39 वर्ष  याचा मृत्यू झाला संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले त्यानंतर प्रथमदर्शनी त्यांना संदीप ने  विष प्राशन केले असे सांगण्यात आले ,  त्यांनी मृतदेह चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालय मध्ये आणला  पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी  डॉक्टरना मृत्यूचे कारण विचारले  एवढ्या लवकर PM रिपोर्ट देने शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले  त्यानंतर मृतदेह अमरावती येथे नेण्यात आला व तात्काळ PM करण्यात आले व पोलिसांचा असलेला संशय हा खरा ठरला  संदीप भाकरे यांचा मृत्यू विष प्राशन केल्याने नाही तर गळा आवळून  खून केल्याने झाला असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले;

 

संदीप भाकरे चा मित्र योगेश भाकरे चांदुर बाजार मध्ये एका खासगी हॉस्पिटल मध्ये काम करतो  पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्यांनी आधी उडवा उडवी ची उत्तरे दिली नंतर पोलीस हिसका दाखवताच त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली ,

 

आरोपीने संदीप ला शेतात नेऊन दारू पाजली आणि संदीप पूर्ण नशेत असताना योगेशने गळ्याला दुपट्याने संदीप ची गळा आवळून हत्या केली.

 

पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 302  नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे

ठाणेदार श्री नरेंद्र पेंदोर , psi प्रतिभा मेश्राम , ASI विनोद इंगळे , अजय पाथरे , श्रीकांत निंभोरकर, विनोद दाभने , महेश काळे  व इतर कर्मचारी यांनी अत्यंत हुशारीने काही तासात या खून प्रकरणाचा छडा लावला