ज्यांनी अपहरणाचा कट रचला त्यांनाच नोकरीची ऑफर दिली; राधेश्याम चांडक यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलं

0
4870
Google search engine
Google search engine

विनायक देशमुख / बुलढाणा:

 

काही दिवसांपूर्वी बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहणाचा कट रचण्यात आला होता.मात्र आता चांडक यांनी अपहरण कटामध्ये सहभागी असणाऱ्या तीनही युवकांना रोजगार देण्याची किंवा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.चांडक यांच्या या कृतीची संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत असून कौतुक करण्यात येत आहे आहे.

बुलडाणा अर्बनच्या भाईजी ऊर्फ राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचल्याप्रकरणी दिल्लीतून आयबीने तीन तरुणांना ताब्यात घेतले होते.अटक करण्यात आलेले तीनही संशयित बुलडाणा शहरातील रहिवासी असून त्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले होते.पोलिसांनी त्या तिघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली होती.झटपट श्रीमंत होण्यासाठी आरोपी तरुणांनी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती या दोघांचं अपहरण करण्याचा कट रचला.मिर्झा आवेज बेग, शेख साकीब शेख अन्वर, उबेद खान शेर खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते बुलडाणा शहरातील रहिवासी आहे.