0
240
Google search engine
Google search engine

डाॅ.सांगळे यांना परत चीमुकल्याचा गळ्यातून १ रुपयाचे नाणं काढण्यास यश.

शेगांव:- चिमुकल्याचा या वयात त्यांना काही नवनवीन वस्तूची आवड असते कुठलीही वास्तू आकर्षित दिसते. लहान मुलांना अशा कुठलीही वस्तू खेळत तोंडात टाकण्याची आवड असते परंतु अशाच खेळातून काही गोष्टी जिवावर बेतू शकते व अशा वस्तू पासून घातक सुद्धा होऊ शकतात. अशीच एक घटना शेगाव मधील सरकारे फैल भागातील एका चिमुकल्या सोबत घडली. साधारणतः दुपारी 2.15 च्या दरम्यान साडेतीन वर्षीय मोहम्मद आशिर मोहम्मद आमिर यास तातडीने बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन सांगळे यांच्या स्थानिक अग्रसेन चौक येथील प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले, त्याने खेळतांना 1 रुपयाचे नाणे गिळले होते. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास व्ह्याचा व वारंवार उलट्या होत होत्या.
त्याची तपासणी करून तात्काळ एक्सरे केला असता नाणे श्वसननालिके जवळ असल्याचे निदर्शनास आले.
याआधी अश्याच प्रकारचे 5 रुपयाचे नाणे व बटन बॅटरी सेल काढण्याचा अनुभव पाठीशी ठेवून, बाळाला होणारा त्रास तसेच नाणे श्वसननलिकेत अडकून त्याच्या जीवाला उद्भवणारा धोका लक्षात घेऊन डॉ सांगळे यांनी स्वतःच्या अनुभव व कौशल्याने फोलिज कॅथेटर च्या मदतीने तात्काळ नाणे काढण्याचा निर्णय घेतला. व प्रकरणाची गंभीरता व धोके नातेवाईकांना समजवून सांगितले, त्यांनी लगेच संमती दिली. क्षणाचाही विलंब न करता डॉ सांगळे व टीमने फोलिज कॅथेटर च्या मदतीने घशात अडकलेले 1 रुपयाचे नाणे काढून बाळाचा जीव वाचवला.
काढलेले नाणे पाहताच वडिलांच्या जीवात जीव आला, व आईच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारांना विराम मिळाला. चिमुकल्याचा पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले.