जवळपास 2 तास विद्यार्थिनींनी रोखून धरल्या MSRTC च्या बसेस; वाहक चालकांवर रोष – गाड्या स्टॉपवर थांबवत नसल्याचा आरोप

4962

विद्यार्थिनींना अश्रू अनावर 

प्रवाशीही संतापले 

 

अमरावती :- चांदुर बाजार वरून बोराळा मार्गे अमरावती जाणाऱ्या बसेस नांदुरा येथे थांबवल्या जात नाहीत शाळेत जायला उशीर होतो ताटकळत स्टॉप वर थांबून राहावं लागतं या व अश्या अनेक समस्यांसाठी नांदुरा गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज साडे अकराच्या सुमारास जवळपास 2 तासांपर्यंत गावातून एकही एसटी बस जाऊ दिली नाही यावेळी अनेक प्रवाशी देखील संतप्त झाले होते घटनास्थळी पोलीस ही दाखल झाले परंतु विद्यार्थिनींनी आमचे प्रश्न सोडवल्याशिवय आम्ही एकही एसटी जाऊ देणार नाही असाच प्रवित्रा घेतल्यामुळे अखेच चांदुर बाजार येथील MSRTC चे अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी विद्यार्थिनींची समज काढली .
वाहक चालक ठरलेल्या जागी एसटी थांबतवत नाहीत पुलावर नेऊन एसटी थांबवतात जर तिथे स्टॉप असेल तर तिथे बस स्टॉप बांधा असंही विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले , या मार्गावरील वाहक विद्यार्थिनिंशी अभद्रपणे वागतात त्यांना ढकलतात असेही विद्यार्थिनींनी सांगितले.

 

निवेदन देताना विद्यार्थिनी

चांदुर बाजार आगाराच्या मॅडम नि नांदुरा येऊन विद्यार्थिनींना आश्वासन दिल्यानंतर एसटी बसेस जाऊ देण्यात आल्या

जाहिरात
Previous articleअमरावती ब्रेकिंग :- रहाटगांजवळ रिंगरोड वर नाल्यात एसटी बस पडली ; सुदैवाने जीवितहानी नाही
Next article#लोकमत कॅम्पस क्लब आणि टीसीसी आयोजित – *बालदिनाच्या चित्रकला स्पर्धेत गौरी बेहेरे ला प्रथम पारितोषिक*