कृष्णाजींच्या मळ्यात प्रगट दिन उत्साहात साजरा

0
208
Google search engine
Google search engine

कृष्णाजींच्या मळ्यात प्रगट दिन उत्साहात साजरा
शेगांव—- संत गजानन महाराजांच्या काही काळ वास्तव्याने पावन झालेल्या स्थानिक कृष्णाजींच्या मळ्यात मोठ्या आनंद उत्सवात श्रींचा १४५ वा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला. या मळ्यात महाराज अनेक दिवस वास्तव्यास राहिले असून ते एकांतात शिवसानिध्यत रमत असत अशा या पवित्र मळ्याचा जीर्णोद्धार कृष्णाजी पाटलांचे वंशज शैलेंद्र पाटील (माजी नगराध्यक्ष) यांनी २०२१ मध्ये केला व भाविक भक्तांना श्रींच्या वास्तव्याने पावन झालेल्या मळ्याचे दर्शन सहज सुलभ झाले. दिनांक १३ फेब्रुवारी सोमवार ला महाराजांच्या १४५ वा प्रगट दिन निमित्त मळ्यात विद्युत रोशनाई सह सजावट करण्यात आली होती.
चिमुकलीने केले ग्रंथाचे मुखोद्गगत पठण

प्रगट दिन निमित्त पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यात असलेले सुनिल ढोलेयांची मुलगी “कु.सूरभी ढोले “इयत्ता पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती कृष्णाजींच्या मळ्यात आली व तेथे भक्तीमय वातावरणात रममाण झाली आणि तिने महाराजांचे विजय ग्रंथाचे पारायण म्हणण्याची इच्छा पाटलांकडे व्यक्त केली. चिमुकलीने न वाचता उपस्थित भक्तांसमोर ग्रंथाचे मुखदगत पारायण पूर्ण केले. त्या चिमुकलीचे हे अवलोकिक सामर्थ्य पाहता सौ. अनुपमा शैलेंद्र पाटील यांनी त्या चिमुकलीच्या यथोचित सत्कार सुद्धा केला. महाआरती व महाप्रसाद प्रगट दिनानिमित्त महाआरतीचे नियोजन करीत संध्याकाळी सात वाजता महारथी व नंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसाद तर अनेक भक्त ग्रहण करत असतात पण महाप्रसाद बनवण्याचा प्रक्रियेत भक्तांचा सहभाग हा दुर्मिळ योग कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात पहावयास मिळाला हे विशेष शेगांवातील रोज आरतीस येणार्र्या व साताऱ्याकडील काही महिला भक्त होत्या त्या दर्शनाकरिता आल्या असत्या त्यांना मोकळ्या जागेत महाप्रसाद तयार होताना दिसला व त्यात पोळ्या करण्याचा सहभाग घेऊन श्री चरणी आपली अशी सेवा समर्पित केली व त्या सेवेचा आनंद त्या भगिनींच्या चेहऱ्यावर दिसून येत होता हे उल्लेखनीय. तसेच दर गुरवारी व एकादशी ला मळ्यात महाप्रसादाचा लाभ भक्त घेतात.

् भजन संध्या

प्रगट दिनी मळ्यात रात्री दोन तास भजन संध्या कार्यक्रम पार पडला या मध्ये हभप डॉ. ज्ञानेश्वर नेमाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक सरस भजन गाऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. अशा विविध माध्यमातून श्रींचा १४५ वा प्रगट दिन कृष्णाजींच्या मळ्यात मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.